पोस्ट्स

2024 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कुंभार्ली घाटातली वाघबारस

इमेज
वाघबारसविषयी मी ऐकून होतो. तलासरी भागात असल्यामुळे इथल्या वाघबारसची कल्पना आहे परंतु कुंभार्ली घाटात होणारी वाघबारस पाहायची उत्सुकता लागली ती सदफची पोस्ट पाहिल्यावर. खरं तर हा मागच्या वर्षीचा(२०२३) अनुभव आहे. चिपळूण येथे राणी आणि सदफ यांच्या सह्याद्री संवर्धन व संशोधन संस्थेत(SCRO) पोचलो. तिथून आम्ही कुंभार्ली घाटच्या दिशेला निघालो. घाटमाथ्यावर किसरुळे, भाटी, केमसी आणि कासारखडकपाडा असे चार धनगर समाजाचे पाडे. त्यातील कासारखडकपाडा येथे वाघबारस साजरी करण्याकरिता तिकडे गेलो. कासारखडक पाड्यात एकूण पाच कुटुंब. साधारण पंचवीसेक लोकसंख्या.  पाड्यातल्या एका मोकळ्या जागेत गावकरी, लहान मुलं आणि वाघबारस बघण्याकरिता मुंबई, पुणे येथून आलेले आम्ही सारे जमलो होतो. वाघबारसकरिता आलेल्या पाहुणे मंडळींनी पाड्यातील लहान मुलांना रंगवायचे होते. थोडक्यात काय तर त्यांनी वाघ, बिबट्या, कोळशिंदा, अस्वल कसे दिसतात या कल्पनेतून मुलांचे चेहरे रंगवायचे होते. सर्वांनी ते केले शिवाय आमच्यातले काही जण स्वतः रंगण्यासाठी इच्छुक झाले. मग तिथल्या मुलांनी आमच्या चेहऱ्यावर वाघ, कोळशिंदा असे चित्र रेखाटले. वाघबारस दिनी पाड्...

पुस्तक परिचय - सत्तर दिवस

इमेज
पुस्तक - सत्तर दिवस लेखक -  रवींद्र गुर्जर युरुग्वे दक्षिण अमेरिकेतील एक छोटासा देश. त्या देशातील तरुणांनी रग्बी खेळात दोनदा राष्ट्रीय अजिंक्यपद पटकावले होते. यावेळीही ते अजिंक्यपद पटकवण्यासाठीच निघाले होते. दिनांक १२ ऑक्टोबर १९७२. एअरफोर्सच्या 'फेअर चाईल्ड एफ २२७' ह्या विमानानं पंचेचाळीस प्रवाशांसह आकाशात झेप घेतली. हिमालयसारख्या पर्वत रांगा या भागात आहे. विमान आकाशात झेपत असताना खराब हवामानमुळे त्यांचं विमान कोसळतं. आणि जगाशी संपर्क तुटतो. चहू बाजूने बर्फाच्छदित प्रदेश. यातून सुटका करण्याकरिता चिली, अर्जेंटीना सारखा नजीकचा देश सहकार्य करतो पण तो देखील अपयशी ठरतो. त्या बर्फाच्छदित प्रदेशात फसलेल्या पंचेचाळीस लोकांपैकी केवळ सोळा जणं जिवंत राहतात. त्या सोळा जणांनी अनुभवलेलं मरण या पुस्तकात कथित केलं आहे. मुबलक जेवण सोबत नाही तसेच संपर्क करण्याकरिता साधन नाही. जिवंत राहण्यासाठी काहीतरी खाणं आवश्यक होतं. म्हणून सोळा जणांनी नरमांस भक्षण करत सत्तर दिवस काढले. त्या सोळा जणांनी आपापसांत कामे वाटून तेथून बाहेर निघण्याचे प्रयत्न केले आणि त्यातून ते सुटले तब्बल सत्तर दिवसांनी. या सत्तर द...

कोहोज ट्रेक...

इमेज
सप्टेंबर महिन्यातला ट्रेक करिता ठरवलेला कोहोज किल्ला. यावेळी कोहोज किल्ल्याला जाण्याकरिता खूप उशीर झाला. नाणे गावमार्गे जाण्याचे नियोजन ठरले. स्थानिक दोन-तीन गावकरी आम्हाला दिले. पण त्यातले एकच जण आमच्या सोबतीला आला. प्रचंड पावसामुळे गवत आणि झाडांची वाढ मोठ्या प्रमाणात झालेली असल्यामुळे जाणारी वाट समजून येतं नव्हती. 'शककर्ते शिवराय' समूहाने दिशादर्शक बाण असलेले पोस्टर लावलेले पण त्यावरील बाण स्पष्ट दिसत नव्हते. पायथ्याला आम्ही पंधरा-वीस मिनिटे रस्ता भरकटलो होतो. मार्गदर्शकाला पण ठाऊक नव्हतं. अखेर त्याने एक वाट दाखवत आम्ही त्यामार्गे निघालो. आणि गडाच्या मूळ वाटेशी पोचलो. सरळ उंच अशा चढाईचा किल्ला. रस्त्यात मोठमोठे दगड. आणि त्या पावसामुळे दगडांवर आलेले शेवाळे त्यामुळे पायही सरकत होते. अर्ध्या टप्प्यात गेल्यावर सरळ उंच अशी दगडांची रांग होती. एकमेकांचा हात देत मदत करत वर चढलो. हा अनुभव खूप थरारक होता. दोन टेकड्या चढल्यावर गडाच्या अर्ध्या रस्त्यात पोचतो. महादेव मंदिर परिसरात पाण्याचे टाके आहेत तसेच मंदिराच्या शेजारी दोन तोफा आहेत. मंदिराच्या समोर काही जुने अवशेष एका झाडाखाली रचून ...

पाटणादेवी मंदिर...

इमेज
लहानपणी अनेकांनी महादेवाच्या मालिका पाहिल्या असतील. त्यात राग आल्यावर महादेवाने तांडव नृत्य केल्याचं देखील पाहिलं असेल. त्याची कथा अशी होती की, दक्षप्रजापती यांनी एक यज्ञ केला होता. त्या यज्ञास दक्षप्रजापतीची सती नामक पुत्री आणि त्या सतीचे पती महादेव यांना निमंत्रण नव्हते. तरीही सती त्या यज्ञास जाते. आणि तिथे तिचा अपमान होतो. झालेल्या अपमानाची चीड येऊन सती त्या यज्ञात स्वतःचा देह टाकून देते. महादेवाला असे समजताच त्यांना प्रचंड राग येतो. महादेव सतीच्या शवाला जवळ घेतात व दक्षप्रजापतीचे मुंडके छाटतात. आणि तांडव नृत्य करायला लागतात. ते करत असताना त्यांचे तिसरे नेत्र उघडले जाते. त्यावेळी भगवान विष्णू सुदर्शन चक्राचा वापर करून सतीचे तुकडे करतात. सतीचे तुकडे ज्या ज्या ठिकाणी पडले ती ती ठिकाणं शक्तिपीठ म्हणून प्रसिद्ध झाली. अशा अनेक आख्यायिका आजही ऐकायला मिळतात. पाटणादेवी मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ असलेली दीपमाळ... खान्देशातील चाळीसगावपासून अठरा किलोमीटर अंतरावर पाटणा हे गाव आहे. गावच्या नजीक गौताळा अभयारण्य आहे. त्यात चंडिकादेवीचं मंदिर(पाटणादेवी), हेमाडपंथी महादेव मंदिर, कन्हेर गड, पितळखोर...

पुस्तक परिचय - कथा अणुस्फोटांची

इमेज
पुस्तक - कथा अणुस्फोटांची लेखक - निरंजन घाटे ११ मे १९९८ आणि १३ मे १९९८ रोजी भारतानं एकूण पाच अणुचाचण्या केल्या. यामुळे बहुसंख्य भारतीयांना खूप आनंद झाला. त्यावेळी बऱ्याच वाचकांनी वृत्तपत्रांना पत्र पाठवून आपापली मतंही व्यक्त केली. बहुतेकांचा सूर भारतीय शास्त्रज्ञांच्या अभिनंदनाचा होता. या काळातच पुस्तकाची छपाई सुरू होती. वेगवेगळ्या देशांनी अणुबॉम्ब तयार करताना काय केलं याची माहिती या लेखांमधून आढळते. याप्रमाणे शत्रूपक्षाला बॉम्ब मिळू नये म्हणून इस्त्राईलसारखे देश कसे धडपडतात त्याचीही माहिती या पुस्तकात आहे. चोरट्या मार्गानं अणुबॉम्ब मिळवण्याचे प्रयत्नही दिसतील. भारतानं निर्माण केलेली अण्वस्त्र अशी चोरून मारून केलेली नाहीत तर भारतीय शास्त्रज्ञांच्या अथक परिश्रमाचं ते फळ आहे. हे भारतीय अण्वस्त्रांचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. ज्यांना अण्वस्त्रनिर्मितीचा इतिहास आणि अण्वस्त्रधारी बनण्यासाठी वेगवेगळ्या राष्ट्रांनी कोणकोणते प्रयत्न केले याची माहिती हवी असेल. तर त्याची झलक या पुस्तकात बघायला मिळेल. - शैलेश दिनकर पाटील

मित्राची कारागिरी...

इमेज
कंपनीच्या स्पोर्ट्स करिता रत्नागिरीत गेलो होतो. जेवण आटपून आम्ही मारुती चौकातल्या मारुती मंदिरात फेरफटका मारायला गेलो. तेथे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे शिवाय काही तोफ, तुतारी, ढोल वाजवतानाचे मावळे अशी शिल्प आहेत. ते ठिकाण आवडलं म्हणून फोटो काढून अपलोड केला. तर मित्र वैभवचा मॅसेज आला. 'जरा क्लिअर फोटो पाठव.' त्याला दोन-तीन फोटो पाठवले. ते पाहून त्याचा मॅसेज आला की, हे मी बनवलं आहे. मारुती चौकात असलेलं शिल्प  सुरवातीला वाटलं हा असा का बोलत आहे हे स्मारक बांधून तर बरीच वर्ष झाली. तितक्यात त्याने जुने फोटो पाठवले. ज्यावेळी स्मारकाचं काम सुरु होतं तेव्हाचे ते फोटो होते. तो म्हणाला की, आम्ही कॉलेजला असताना आम्हाला प्रोजेक्ट दिलेला. तेव्हा आम्ही हे बनवले होते. त्याचं काम पाहून खूप अभिमान वाटला. आणि उगाच माझी कॉलर ताईट झाली. जेवण झाल्यावर आमचा काही स्टाफ तिथे आला होता. त्यांना अभिमानाने सांगितलं की हे माझ्या मित्राने बनवलं आहे. खरं सांगू मला फार भारी वाटलं. वैभवची कलाकारी.. वैभव एक उभरता शिल्पकार आहे. आमचा परिचय विकासच्या माध्यमातून झाला. खरं तर वैभव बाराखडीच्या पोस्ट पहायच...

पुस्तक परिचय - माझी काटेमुंढरीची शाळा

इमेज
पुस्तक - माझी काटेमुंढरीची शाळा लेखक - गो. ना. मुनघाटे गडचिरोली सारख्या नक्षलवादी भागात असणारे काटेमुंढरी हे गाव. माडिया गोंड हा आदिवासी समाज याच परिसरातला. या गावात एका शिक्षकाची नियुक्ती होणे. आणि ते त्याच्या मनाविरुद्ध घडलं. म्हणून सरकारविषयी सूड मनात ठेवला आणि व्यसनाच्या आहारी गेला. आणि अशातच त्याची आत्महत्या/खून झाला. गावात शाळा आहे शिक्षक हवा म्हणून गोविंदराव मुनघाटे यांची नियुक्ती झाली. काटेमुंढरी जाताना 'बाबूजी काहेको मरने काटेमुंढरी जाते हो' असा सल्ला ट्रक ड्रायव्हरने दिला. पण तरीही आपली वाट धरून मुनघाटे गुरुजी गावात पोचले. गावचे मडगू पाटील यांनी केलेले स्वागत आणि त्यांनी दिलेली मोलाची साथ गुरुजींना खूप भावली. गावचा कायापालट करण्याकरिता गुरुजींना महत्वाची साथ लाभली ती गावचे मडगू पाटील, गावचा खबरी डाफ्या कोतवाल, विद्यार्थी शिदू यांची.. हे पुस्तक वाचताना खऱ्या अर्थाने सामाजिक भान जपणारी माणसं वाचायला मिळतात. त्यातील उत्तम उदाहरण म्हणजे नागोसे गुरुजी आणि मडगू पाटील... विद्यार्थ्यांसाठी जीव ओतून काम करणाऱ्या नागोसे गुरुजींना देखील कारागृहात जावे लागते अन् खोट्या आरोपांमुळ...

पुणे नगर वाचन मंदिर

इमेज
पुणे रेल्वे स्थानकापासून पंधरा मिनिटांच्या अंतरावर 'पुणे नगर वाचन मंदिर' आहे. १७५ वर्षे जुन्या असलेल्या या वास्तूला हेरिटेजचा दर्जा प्राप्त आहे. ०७ फेब्रुवारी १८४८ साली वाचन मंदिराची स्थापना झाली. या वाचन मंदिराचे संस्थापक लोकहितवादी(गोपाळ हरी देशमुख). पुणे नगर वाचन मंदिर वास्तू. वाचन मंदिराच्या पहिल्या मजल्यावर वाचन कक्ष आणि अभ्यासिका आहे. मराठी-इंग्रजी वर्तमानपत्रे, साप्ताहिक, मासिक आणि इतर पुस्तके वाचणासाठी उपलब्ध आहेत. तसेच विद्यार्थ्यांकरिता अभ्यासिकेची सोयही उपलब्ध आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला लॉकर दिलेले आहेत. याच वाचनकक्षेत छत्रपती शिवाजी महाराज, वीर सावरकर, लोकमान्य टिळक, आचार्य अत्रे, लोकहितवादी, बालगंधर्व या महापुरुषांची तैलचित्रं आहेत. दुसऱ्या मजल्यावर पुस्तकांचं दालन आहे. जवळपास एक लाखापेक्षा अधिक पुस्तके येथे उपलब्ध आहेत. प्रत्येक पुस्तकाला कोड दिलेला आहे जेणेकरून ते शोधण्यास अधिक सुलभ होईल. अभ्यासिका अन् वाचन कक्ष वाचन मंदिरातील वाचक सभासदांची संख्या तीन हजारपेक्षा अधिक आहे. तुळशी बाग येथे मुख्य शाखा आहे. दूर राहणाऱ्या वाचकांना पुस्तक देवघेवसाठी सोयीचं व्हावं म्ह...

पुस्तक परिचय - युद्ध जीवांचे..

इमेज
पुस्तक - युद्ध जीवांचे लेखक - गिरीश कुबेर गिरीश कुबेर लिखित युद्ध जीवांचे हाती आलं. आतापर्यंत असं वाटायचं, की शस्त्रविना युद्ध अशक्यच आहे. पण या पुस्तकात रासायनिक हल्ल्यांविषयी जे काही लिहिलं आहे ते फारच भयानक आहे. जगात खूप काही सुरू असतं पण सामान्य माणसांपर्यंत त्याची फारशी माहिती पोचत नाही. जैविक आणि रासायनिक युद्धांचा इतिहास या पुस्तकात मांडला आहे. विषारी वायूंची निर्मिती करणारे देश आणि त्यांनी त्यांच्या शत्रूराष्ट्रांवर केलेले हल्ले याची संदर्भासहित नोंद पुस्तकात आहे. बर्ड फ्ल्यू, स्वाईन फ्ल्यू सारख्या विषाणूंची निर्मिती करून त्याच्यावर औषधी बनवून बाजारीकरण करणारे देश स्वतःला महासत्ताक समजतात. या रोगाच्या विषाणूंचा प्रयोग सामान्य माणसावर केला गेला.  हिरोशिमा नागासाकीवर केलेल्या हल्ल्यामुळे आपल्याला जपानवर कीव येते पण जपानही काही साधा भोळा नाही त्याने तर माणुसकीच्या सगळ्या हद्द पार केलेल्या आहेत. त्यांच्यावर अणुहल्ला का करावा लागला याचा तपशील लेखकाने सविस्तर मांडलेला आहे. हिटलर, विस्टन चर्चिल, जॉर्ज बुश, सद्दाम यांच्या दुष्कर्माचा उल्लेख यांत आहे. सद्दामसारख्या नराधमाला मदत करण...

येथेही आषाढीची यात्रा भरते...

इमेज
माझे मित्र सुनील यांच्या वडिलांकडून गोविंद महाराज यांच्याविषयी बरंच ऐकून होतो. आणि ते जाणून घेण्याची इच्छा होती. ऐन दिवाळीत गोविंद महाराजांच्या मंदिरात जाण्याचा योग आला. गावातील लोकं म्हणतात की, गोविंद महाराज हे संत तुकारामांचे अवतार होते. त्यांनी देखील अभंग रचले आहे. आणि त्या अभंगात तुकारामांचा उल्लेख आढळतो. गोविंद महाराज यांचा जन्म जळगाव जिल्ह्याच्या एरंडोल तालुक्यातील उत्राण या गावातला. त्यांचा जन्म १७८५ सालचा. लहानपणापासून विठ्ठलाची भक्ती करणं आणि त्याचा जप करणं हे आवडीने करायचे. शिवाय तुकारामांच्या अभंगाचा प्रभाव त्यांच्यावर पडला असे म्हणायला हरकत नाही. गोविंद महाराज मंदिर.. भक्तीनादात अडकलेल्या गोविंद महाराजांचा विवाह करवून दिला. पण तरीही ते विठ्ठलाच्या भक्तीत लीन होते. असंच एके दिवशी ते जपनाम करत पंढरपूर पायी निघाले. त्यावेळी भाविक भक्त म्हणत की, गोविंद समर्थ पांडुरंग वेडे झालेत. अशा या गोविंद समर्थ महाराजांचे मंदिर पिंपळगाव हरेश्वर येथे आहे. गोविंद महाराजांची प्रतिमा आणि त्यांनी लिहिलेला ग्रंथ... आषाढी एकादशीवेळी गावात मोठी जत्रा भरते. वेगवेगळ्या गावांतून दिंड्या येतात. भाविका...

फॅन्ड्री फाउंडेशनचा प्रोजेक्ट होप...

इमेज
फॅन्ड्री फाउंडेशन 'Project Hope' उपक्रमाअंतर्गत शैक्षणिक साहित्य आणि इतर उपक्रमांचे आयोजन करते. जून महिन्यात शाळा सुरु झाली की साहित्य वाटपाची तयारी सुरु होते. फॅन्ड्रीच्या कार्यक्रमाची माहिती प्रवीण दाभोळकरांकडून समजली. फॅन्ड्रीच्या स्वयंसेवकाशी संपर्क साधून त्यांच्या उपक्रमात सामील झालो. पालघर जिल्ह्यातील मनोरपासून आठ-दहा किलोमीटर अंतरावरील तांबडीपाडा येथे शैक्षणिक साहित्य वाटपासाठी गेलो होतो. फॅन्ड्रीची टीम होतीच त्यांच्यासोबत मी आणि कामिनी नव्याने जोडलो गेलो होतो. पाड्यात गेल्यावर शाळा पाहिली. शाळेतील शिक्षक संतोष निमसे सरांनी स्वागत केले. इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतची शाळा. आधी वाटलेलं की गरम व्हायला नको म्हणून विद्यार्थ्यांना अंगणात बसवलं असेल. पण सरांशी चर्चा केल्यावर समजलं की त्या अंगणातच शाळा भरते. पूर्वी तेथे गोठा होता. आता तो दुसऱ्या ठिकाणी बांधण्यात आला आहे. गावातल्या मुलांना शिक्षणासाठी दुसऱ्या पाड्यात जावे लागायचे. त्यांचा त्रास वाचावा म्हणून तांबडीपाडा येथे शाळेसाठी मान्यता मिळवली. परंतु जागा उपलब्ध नसल्यामुळे पाड्यात कोणाच्या तरी घरी शाळा सुरु करावी लागणार होती....

पुस्तक परिचय - तोत्तोचान

इमेज
पुस्तक - तोत्तोचान लेखिका - तेत्सुको कुरोयानागी अनुवाद - चेतना सरदेशमुख-गोसावी. ती तिच्याच विचारात मग्न राहते. पक्षांशी काय बोलते, बाकावर बसून बाहेरच्या लोकांशी गप्पा मारते. इतर मुलांचे लक्ष विचलित करते. अशा अनेक तक्रारी एका शिक्षिकेने तोत्तोचानच्या आईकडे मांडल्या. आता तिला दुसऱ्या शाळेत प्रवेश घ्यायचं म्हटलं तर तिच्या वागण्यात बदल करावा लागेल. जे खूप कठीण होतं. जपानच्या तोमाई शहरात रेल्वेच्या डब्ब्यांची असणारी एक आगळीवेगळी शाळा होती. तिथे तोत्तोचानला घेऊन गेले. तिला तेथील शाळा खूप आवडली पण आपलं कोणी ऐकून घेईल का या चिंतेत ती होती. परंतु घडलं वेगळंच. चार तास मुख्याध्यापकांनी तिचं म्हणणं ऐकून तिला शाळेत प्रवेश दिला. आणि मग पुढे जे काहीच घडलं ते अद्भुतच! मुलांनी बोलतं असायला हवं, प्रश्न विचारायला हवे, आणि त्यातूनच वेगवेगळे प्रयोग करायला लावणारी ही आगळीवेगळी शाळा. या शाळेत तोत्तोचानचं मन रमलं. एकमेकांना समजून घेतलं विविध प्रयोग केले. मुख्याध्यापकांचं कौतुक असं बरंच काही घडलं. पण हे सगळं घडत असताना जपानवर अमेरिकेकडून बॉम्बचा वर्षाव होत होता. जपान तोमोई शहर संपूर्ण रिकामे होत होते आणि इतक्...

वाबळेवाडीची प्रयोगशील शाळा..

इमेज
वाबळेवाडीच्या झिरो एनर्जी स्कुल बद्दल ऐकून होतो. आम्ही मित्र अष्टविनायक करत होतो त्यावेळी थेऊरचा बाप्पा करून आम्ही शिक्रापूर मार्गे वाबळेवाडी शाळेत पोचलो. वाबळेवाडीची ही शाळा जिल्हा परिषदेची . माध्यम मराठी. शाळेच्या गेटमधून आत प्रवेश केला तर शाळेचं वातावरण उत्सवमय होतं. गोपाळकाला असल्यामुळे शाळेत दहीहंडीचा छोटासा कार्यक्रम सुरु होता. शाळेच्या प्रवेश द्वारापाशी चप्पलचे स्टॅन्ड आहे. तेथे शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांनी त्यांच्या चपला अगदी शिस्तबद्ध पद्धतीने रचून ठेवल्या होत्या. वारे गुरुजींनी या शाळेचा कायापालट केल्या त्याबद्दल ऐकून होतो. फारूक सरांना फोन करून त्यांनी मला तिथल्या सचिन सरांचा नंबर दिला होता आणि आदल्या दिवशी आम्ही येणार असल्याची कल्पना त्यांना दिली. शाळेत पोचल्यावर आम्ही सचिन सरांची भेट घेतली. आणि मग आमच्या गप्पा सुरु झाल्या. शाळेची वर्गखोली. २०१२ साली दत्तात्रय वारे गुरुजींची या शाळेत बदली झाली. ग्रामस्थांशी चर्चा आणि त्यांच्या भेटीगाठी करत त्यांना विश्वासात घेऊन गुरुजी आणि ग्रामस्थांनी शाळेचा कायापालट केला. ग्रामस्थांनी स्वतःची एक-एक गुंठे असे करत दीड एकर जमीन शाळेकरिता...

पिंपळगाव येथील हरिहरेश्वर मंदिर...

इमेज
जळगाव जिल्ह्याच्या पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर या गावाला इतिहास आहे. गावातली अनेक घरं जुन्या धाटणीची आहेत. शिवाय गावात असलेलं हरिहरेश्वराचं मंदिर. साधारण तेराव्या शतकात मंदिर बांधल्याचे सांगितले जाते. हे मंदिर हेमाडपंथी आहे. परंतु आता मंदिराला रंग देण्यात आला आहे. पिंपळगावपासून एक किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे. मंदिराच्या समोर नदी(बहुळा?)वजा ओढा आहे. मंदिराच्या आवारात मोठ्या पायऱ्या आहेत. त्यातील दुसऱ्या पायरीवर ' ॐ श्री हरिहरेश्वराय नमः या फरशीचे काम शके १८४१ त झा ले...' असा मजकूर कोरलेला आहे. मंदिराचे प्रवेशद्वार. मंदिराच्या मुख्य प्रवेश द्वारातून आत गेल्यावर उजव्या बाजूला भास्करचार्य आणि लिलावती या दोघे भाऊ-बहिणीची समाधी आहे. भास्कराचार्यांनी शून्याचा शोध लावला हे आपणा सर्वांना ज्ञातच आहे. या समाधीच्या बाजूला नंदी आहे. तो नंदी दरवर्षी बैलपोळा या दिवशी तिळातिळाने पुढे सरकतो. अशी आख्यायिका सांगितली जाते. भास्करचार्य आणि लिलावती यांची समाधी. नंदीच्या अगदी समोर मुख्य मंदिराचे प्रवेशद्वार आहे. तेथे आत गेल्यावर मंदिराच्या गर्भातील कोरीव नक्षीकाम पहायला मिळते. तेथेच गणपतीची...

"संजान डे"

इमेज
दररोजच्या प्रवासात संजान गावानजिक एक अग्नीज्वाला असलेला स्तंभ दिसतो. तो स्तंभ पारशी लोकांचं प्रतीक असल्याचं सांगितलं जातं. त्या स्तंभाविषयी माहिती घेण्याकरिता काल गेलो. झादरान कॉलेजमधील एक शिक्षक त्या स्तंभाची आणि परिसराची देखभाल करतात. १५ नोव्हेंबर हा दिवस 'संजान डे' म्हणून साजरा केला जातो. डहाणूपासून संजान(गुजरात दिशेने) हे चौथे रेल्वे स्टेशन. मध्ययुगीन काळात संजान हे बंदर होतं. आजही नारगोल दिशेला जाताना संजान बंदर असा बोर्ड लावलेला दिसेल. स्तंभ. पर्शियात राहणारे पारशी. असं म्हणतात की, पर्शियावर इस्लामने आक्रमण केले. आणि त्याला इराण असे नाव मिळाले. तेथे असणाऱ्या पारशी बादशहाचा पराभव झाला. आणि तेथील लोकांचा धर्मच्छळ सुरु झाला. त्याला त्रासून पारशी लोकं इतरत्र देशांत पांगली. त्यांतील एक जत्था गलबतात बसून समुद्रमार्गे भारताच्या दिशेने मार्गस्थ झाला. ते गलबत संजान बंदरात आले. त्यावेळी तेथे हिंदुचे राष्ट्र होते. हिंदूंनी पारशी लोकांना आश्रय दिला. असं म्हणतात की, दुधात साखर टाकल्यावर दुधाला जसा गोडवा येतो तशाच पद्धतीने आपण एकत्र राहू असे पारशी लोकं सांगत. संजान बंदरानजिक संजान किल्...

निसर्ग पूजणारी माणसं

इमेज
बारड गडावर भेटलेली ही दोन माणसं. त्यातला एक माणूस अगरबत्ती लावून पूजा करत होता त्याच्या जवळ गेलो अन् त्याला विचारलं तेव्हा त्याने सांगितलं की, बाफळी(बाफली?) नामक वनस्पती आहे. ती लावण्याकरिता मी आलो आहे. एखाद्याचं पोट दुखत असेल अथवा पोट साफ होत नसेल तर ही वनस्पती खाल्ली की बरं होतं. शिवाय त्याने ती अगदी कडू असल्याचंही सांगितलं. आम्ही त्याच्याकडून ती बाफळी हातात घेतली आणि त्यांना विचारलं तुम्ही कशाला आलेत. तर ते म्हणाले मी महिन्यातून इथे येत असतो. गडावर बाफळी वनस्पती लावण्याचं काम मी माझ्या परीने करतो. शिवाय हे करण्याआधी ते अगरबत्ती पेटवून काही मंत्र बोलून पूजा करत होते. ही निसर्गपूजा अगदी भावत होती. पुढे गेल्यावर आणखी एक माणूस भेटला तेव्हा ते म्हणाले मी जडीबुटी घ्यायला आलोय. मग आमच्या माहितीकरिता त्यांना विचारलं तर त्यांनी एक एक वनस्पतीची माहिती सांगितली. त्यांच्या हातात जी वनस्पती आहे ती कॅन्सर आजाराकरिता उपयुक्त असल्याचे सांगितले तसेच ज्यांना मूल-बाळ होत नाही त्यांच्याकरिताही काही औषधं असल्याचं त्यांनी सांगितलं. अर्थात हे ते खूप आधीपासून करत असावेत किंवा त्यांच्या घरची ती परंपरा असाव...

बारड ट्रेक अनुभव...

इमेज
मागच्या वर्षी(२०२२) बारड गडाकडे निघालो होतो पण रस्ता चुकल्यामुळे तो पूर्ण करता आला नाही. अखेर मागच्या रविवारी(२०२३ जुलै) आमच्या कार्यालयातील संघटनेच्या वतीने बारड गडाकडे निघालो आणि गडावरील चढाई पूर्ण केली. विशाल महाकाय असा बारड गड. गडावर चढाईकरिता अनेक रस्ते आहेत. उंबरगाव रोड रेल्वे स्थानकापासून चौदा किमी अंतरावर असलेल्या करजगाव येथून गडावर जाता येते. तसेच अस्वली, वेवजी सोनारपाडा येथूनही जाता येते. ०२ जुलैला गडावर तलासरी-डहाणू तालुक्यातील अनेक जण मोठ्या संख्येने तिथे येतात. असं ऐकून होतो की गडावर निसर्गाची पूजा करण्याची ही प्रथा होती. त्यावेळी तारपा व ढोल वाजवून नृत्य करतात.(याबाबत अधिक माहिती मिळवण्याचे काम सुरु आहे.) बारड गडावर बहरोत नामक लेण्या आहेत. त्याचा नेमका इतिहास माहित नाही पण अनेकदा लोकांकडून विविध माहिती मिळत राहते. संजान येथे पारसी लोकांची वस्ती मोठ्या प्रमाणात आढळून येते. साधारण चौदाव्या शतकात तुघलकच्या सेनापतीने संजान येथील पारसी वसाहतीवर हल्ला केला आणि तेथील पारसी लोकं गडावर आले. तेरा वर्ष या गडावर ते लपून होते त्यांनी त्या तेरा वर्षाच्या काळात इराणशाह ज्वाला बहरोत येथ...