पोस्ट्स

मे, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

विशेषांचे मनसोक्त जगणे - सहवास अ केअर

इमेज
समाधान सावंत यांची जळगावला कासोदा येथे विशेष (मतिमंद) मुलांची काळजी घेणारी ‘सहवास - अ केअर’ नावाची संस्था आहे. संस्था सुरू होऊन चार वर्षें झाली. जळगाव जिल्ह्यात विशेष (मतिमंद) मुलांसाठी काम करणाऱ्या संस्था बोटावर मोजण्याइतपत आहेत; त्या मुख्यत: अठरा वर्षांच्या आतील मुलांचा सांभाळ करणाऱ्या संस्था. पण खरा प्रश्न मूल अठरा वर्षांचे झाल्यानंतर काय? सरकार त्या वयानंतरच्या दिव्यांगांना सांभाळण्यास अनुदान देत नाही. समाधान सावंत यांनी वेगळी दुनिया ‘सहवास’ या नावाने तशाच अठरा वर्षांवरील विशेष मुलांसाठी उभी केली आहे. त्या सगळ्यांनी तेथे यावे. त्यांनी छानपैकी जेवण करावे, खेळावे, टीव्ही पहावा- त्यासोबत काही गमतीजमती कराव्या असे सारे डोक्यात ठेवून संस्था उभारली आहे. मी संस्थेत पाय ठेवल्या ठेवल्या तेथील विशेष मुलगा मला विचारू लागला, की “तू कोण?” मी त्याला म्हणालो, “पाहुणा आलोय तुमच्याकडे”. त्याने लगेच स्वागत केले. बाकीजण कॅरम खेळण्यात दंग होते. त्यांना समजले, की कोणीतरी नवीन व्यक्ती आली आहे. म्हणून सगळ्यांनी एकसाथ स्वागत केले. त्यांच्यातील एकजण उठला आणि त्याने गुलाबपुष्प दिले. त्याचे स्वागताचे काम झ...

एक दिवस श्रमदानाचा

इमेज
महाराष्ट्रातल्या गावांत जाऊन तेथल्या माणसांसारखी मेहनत करायची. फावडे, कुदळ घेऊन त्यांच्यासोबत एक दिवसासाठी श्रमदान मोहिमेसाठी जायचं. हे सगळं गेले दोन वर्षांपासून वेगवेगळ्या गावांत जाऊन अनुभव घेतोय. महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने एखाद्या गावात श्रमदानासाठी वेळ द्यायचा. मात्र यावर्षी कोरोनामुळे ही संधी हुकली. मागील वर्षाचा अनुभव खूप चांगला होता. सोशल मीडियावर पाणी फाउंडेशनच्या श्रमदानाविषयी माहिती समजली होती. विकास, परमेश्वर, दीपक आणि मी आम्ही चौघांनी पाणी फाउंडेशनच्या लिंकवर ऑनलाईन नोंदणी केली. जवळचे ठिकाण हवे म्हणून नाशिकमधला सिन्नर तालुका निवडला. महाश्रमदानाच्या दोन दिवसांआधी गावाचे नाव मॅसेजद्वारे कळवण्यात आले. ३० एप्रिलच्या संध्याकाळी निघालो.सिन्नर तालुक्यातील मेंढी गावच्या सहारा व्यसनमुक्ती केंद्राला ( https://sdpmarma.blogspot.com/2020/04/blog-post_25.html ) भेट दिल्यानंतर आम्ही पहाटे महाश्रमदानासाठी सिन्नर तालुक्यातील वडझिरे गावी जायला निघालो. वडझिरे गावातील श्रमदानासाठी किरण भावसार आणि त्यांचे सोबतीदेखील येणार होते. किरण भावसार हे उत्तम कवी. सिन्नरला येण्यापूर्वी त्यांना कल्पन...