पुस्तक परिचय - कथा अणुस्फोटांची
पुस्तक - कथा अणुस्फोटांची
लेखक - निरंजन घाटे
११ मे १९९८ आणि १३ मे १९९८ रोजी भारतानं एकूण पाच अणुचाचण्या केल्या. यामुळे बहुसंख्य भारतीयांना खूप आनंद झाला. त्यावेळी बऱ्याच वाचकांनी वृत्तपत्रांना पत्र पाठवून आपापली मतंही व्यक्त केली.
बहुतेकांचा सूर भारतीय शास्त्रज्ञांच्या अभिनंदनाचा होता. या काळातच पुस्तकाची छपाई सुरू होती. वेगवेगळ्या देशांनी अणुबॉम्ब तयार करताना काय केलं याची माहिती या लेखांमधून आढळते. याप्रमाणे शत्रूपक्षाला बॉम्ब मिळू नये म्हणून इस्त्राईलसारखे देश कसे धडपडतात त्याचीही माहिती या पुस्तकात आहे. चोरट्या मार्गानं अणुबॉम्ब मिळवण्याचे प्रयत्नही दिसतील.
भारतानं निर्माण केलेली अण्वस्त्र अशी चोरून मारून केलेली नाहीत तर भारतीय शास्त्रज्ञांच्या अथक परिश्रमाचं ते फळ आहे. हे भारतीय अण्वस्त्रांचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. ज्यांना अण्वस्त्रनिर्मितीचा इतिहास आणि अण्वस्त्रधारी बनण्यासाठी वेगवेगळ्या राष्ट्रांनी कोणकोणते प्रयत्न केले याची माहिती हवी असेल. तर त्याची झलक या पुस्तकात बघायला मिळेल.
- शैलेश दिनकर पाटील

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा