पोस्ट्स

आदिवासी साहित्य संमेलन...

इमेज
अनुजा अवकाश निरीक्षण केंद्राचे प्रमुख चंद्रकांत घाटाळ ह्यांच्या अनुजा सेवा संस्था कासा व आदिवासी साहित्य परिषद पालघर ह्यांच्या संयुक्त विद्यमानाने ०५ एप्रिल २०२६ रोजी डहाणू तालुक्यातील कासा येथे पहिले आदिवासी साहित्य संमेलन पार पडले. सदर संमेलन ग्रामपंचायतच्या बिरसा मुंडा या सभागृहात संपन्न झाले. संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार व पर्यावरण तज्ञ श्री. देवचंद महाले हे होते. या संमेलनास प्रमुख पाहुणे म्हणून डहाणू-तलासरी विधानसभेचे आमदार श्री. विनोद निकोले होते. संमेलन दोन सत्रात आयोजित करण्यात आलेले. पहिल्या सत्रात बोलीभाषा व आदिवासी साहित्याचे विविध आयाम तर दुसऱ्या सत्रात बोली भाषेत लिहिणाऱ्या नवोदित कविंच्या कविता सादर करण्यात आल्या. डहाणू तालुक्यात असलेले महालक्ष्मी मातेचे मंदिर. या मातेवर आधारित गणू गोविंद सातवी यांनी लिहिलेले 'आई महालक्ष्मी मातेचा इतिहास' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा प्रमुखांच्या उपस्थितीत संपन्न झाला. ठाणे-पालघर जिल्ह्यात ठराविक ठिकाणी बोलली जाणारी डावर बोलीभाषा. या बोलीभाषेचे अभ्यासक श्री. नितीन बोंभाडे ह्यांनी डावर बोलीविषयी संबोधित केले. तलास...

कर्नाळा अभयारण्य आणि किल्ला...

इमेज
मुंबई-पुणे महामार्गावरून प्रवास करताना पनवेल सोडल्यावर रस्त्यालगत 'कर्नाळा पक्षी अभयारण्य' लागतं. पक्षीप्रेमी डॉ. सलीम अली यांच्या प्रेरणेतून हे अभयारण्य साकारलं आहे. या अभयारण्याच्या प्रवेश द्वारातून एक सुळका दिसतो तो म्हणजे कर्नाळा किल्ला. किल्ल्याकडे जाण्यासाठी अभयारण्याच्या प्रवेशद्वारातुनच आत जाता येते. या अभयारण्यात जवळपास दीडशेपेक्षा अधिक पक्ष्यांच्या वावर आहे. त्यामुळे ट्रेक करून झाल्यावर पक्षी निरीक्षण देखील करता येते. येथे पक्ष्यांविषयी त्यांच्या छायाचित्रांसहीत थोडक्यात माहिती दर्शविली आहे. तसेच झाड आणि पर्यावरणाविषयी देखील छानशी माहिती दिलेली आहे. कर्नाळा किल्ल्याच्या इतिहासाचे माहिती पत्रक लावलेले आहे.  आत प्रवेश केल्यावर डाव्या हाताला सुंदर अशी फुलबाग आहे व त्याच्याच बाजूला खेळण्यासाठी बाग बनवलेली आहे. सरळ मार्गाने जाताना आपल्याला किल्ल्यासाठी दिशादर्शक फलक लावलेले दिसतात. त्या फलकाच्या जवळच वनविभागाचे विश्रामगृह, खानावळ आणि कार्यालय असा परिसर आहे. कार्यालयाचा रस्ता पकडल्यास किल्ल्याकडे जाणारा मार्ग लागतो. किल्ला चढताना दाट झाडांमुळे उन्हाच्या झळा फार कमी लागतात. ...

भास्करगड उर्फ बसगड...

इमेज
नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यात असलेली डोंगररांग त्यास 'त्र्यंबक' डोंगररांग असेही म्हटले जाते. या डोंगररांगेत भास्करगड उर्फ बसगड वसलेला आहे. गोंदा घाटावर लक्ष ठेवण्यासाठी या गडाची निर्मिती करण्यात आली. तेराव्या शतकात हा किल्ला यादवांच्या काळात बांधला गेल्याचे सांगितले जाते. बहामनी पाठोपाठ निजामशाहीने देखील हा किल्ला यादवांसोबत युद्ध करून ताब्यात घेतला. निजामशाहीच्या शेवटच्या काळात शहाजी राजेंनी बंड करून भास्करगड ताब्यात घेतला. पुढे तो किल्ला मोगलांनी जिंकला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील पेशवे मोरोपंत पिंगळे यांनी हा किल्ला जिंकून घेतला. १८१८ पर्यंत भास्करगड पेशव्यांच्या ताब्यात होता. भास्करगडाचे वैशिष्ट्ये म्हणजे कातळात खोदलेल्या पायऱ्या आणि सर्पिलाकार मार्ग. या मार्गातून वर आल्यावर प्रवेशद्वार लागते. पूर्वी हा प्रवेशद्वार मातीच्या ढिगाऱ्यात गाडला गेल्यामुळे झोपून(सरपटून) जावे लागायचे. परंतु गडसंवर्धन करणाऱ्या चमुने तो ढिगारा काढून तेथे जाण्याचा मार्ग सुकर केला. प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर गडाच्या माथ्यावर पाण्याचे टाके पहायला मिळतात. तेथेच मारुतीरायाची जुनी मूर्ती...

अशेरीगड...

इमेज
मुंबई-अहमदाबाद महामार्गाला लागून असलेले पालघर जिल्ह्यातील खडकोना गाव. याच गावातून अशेरीगडावर जाण्यासाठी मार्ग आहे. हा गड चढाईला अगदी मध्यम स्वरूपाचा आहे. इतर गडांवर जशी गर्दी असते तशीच गर्दी सुट्टीच्या दिवशी येथे असते. गडाच्या दिशेने जाताना काही ठिकाणी मार्गीका दाखवल्या आहेत. त्या मार्गीकेचा वापर केल्यावर दिशा चुकण्याची शक्यता कमी असते. गडाची पायवाट घनदाट जंगलात आहे. वाटेत काही चौथरे लागतात ते कसले आहेत याबाबत काही कल्पना नाही. घनदाट जंगलाची वाट पार केल्यावर वाघोबा देवाचे स्थान लागते. त्याचे दर्शन घेऊन पुढे गेल्यास कातळात कोरलेल्या पायऱ्या दिसतात. त्या वाटेने अगदी सांभाळून पुढे जावे लागते. गडाच्या टोकावर जाण्यासाठी आपल्याला एक लोखंडी जीना लागतो त्या जिन्यावरून आपल्याला माथ्यावर पोचता येते.  माथ्यावर पोचल्यावर आपल्याला एका दगडावर उठावदार असे मुकुट आणि पोर्तुगीज राजसत्तेचे चिन्ह दिसते. या चिन्हावरून येथे पोर्तुगीतांचे वास्तव्य असल्याचे समजते. गडावर पाण्याचे टाके आहेत त्यातील एका टाक्याचे पाणी पिण्यायोग्य आहे. तेथील पाणी ट्रेकर्स मंडळीची तहान भागवते. बालेकिल्ल्याकडे गेल्यावर आपल्याला ...

कळसुबाई ट्रेक...

इमेज
कधी कधी अचानक ठरलेला प्लॅन तुम्हाला सुखद अनुभव देऊन जातो. महाराष्ट्रातील माउंट एव्हरेस्ट समजलं जाणारं सर्वात उंच शिखर 'कळसुबाई' येथे सूर्योदय पहायला म्हणे अनेकजण येत असतात त्याच भरतीमध्ये आम्ही पण सामील झालो. पण दिवस निवडला तो अगदी शुक्रवार रात्र आणि शनिवारच्या पहाटेचा. नाईट ट्रेकचा वेगळा अनुभव घ्यायचा होता. आकाशातून दिसणारे ग्रह-तारे.. मागच्यावेळी सावर्णे गावात मोहनच्या 'सुख सह्याद्रीत' नाईट कॅम्पिंगचा अनुभव घेतला होता. मोहननेच बारी गावातील सह्याद्री हॉटेलचे जनार्दन कचरे ह्यांचा संपर्क दिला. मग मुक्काम तिकडेच करायचं ठरलं. बारी गावात आम्ही रात्री एक वाजता पोचलो. तेथून जनाभाऊंच्या घरी आलो. तेच आमचे गाईड असल्यामुळे आम्ही एकमेकांची ओळख करत पहाटे तीनला ट्रेक सुरु करायचे ठरवले. आमच्याकडे तासभर वेळ होता. घराबाहेर खुर्च्या टाकून आम्ही बसलो. आकाशाकडे पाहिलं तर ग्रह-तारे अगदी स्पष्ट दिसत होते. मग नेहमी प्रमाणे मोबाईलमध्ये ऍप ओपन करून ग्रह-तारे चाळत बसलो. तेच चाळता चाळता आमच्या गप्पा सुरु होत्या. शिखरावरून दिसणारा सूर्योदय. पहिलाच नाईट ट्रेक असल्यामुळे गाईड घेणं गरजेचं वाटलं आणि...

भिंगरी महोत्सव २०२५

इमेज
अर्थीयन फाउंडेशनच्या भिंगरी महोत्सवाबाबत कल्पना होती. मागच्या वर्षी(२०२४) जाता आलं नाही परंतु यावेळची माहिती अनेकांकडून मिळाली. मुरबाड तालुक्यातील वैशाखरे गावात भिंगरी महोत्सव आयोजिला होता. महोत्सवाचे हे दुसरे वर्ष.(२०२५) ऋषिकेश दाभोळकर यांच्या गोष्टदिंडीच्या दुसऱ्या पर्वाची समाप्ती याच गावात झाली आणि त्यांच्या आगमनाने महोत्सवाला सुरवात झाली. स्टेज आणि प्रवेशद्वारावरील सजावट. गावात एखादा उत्सव असल्यावर सजावटीसाठी जशी लगबग असते अगदी तशीच लगबग या उत्सवासाठी सुरु होती. रस्त्याच्या दुतर्फा रांगोळी तसेच गावातल्या प्रत्येक घराच्या बाहेर फुलांच्या आणि रंगांनी भरलेल्या मोठमोठ्या रांगोळ्या. शिवाय गाव एकदम स्वच्छ होतं. गावातील मारुती मंदिराजवळचं मैदान गावातल्या तरुणांनी तसेच अर्थीयनच्या टीमने पूर्णपणे स्वच्छ केलं आणि छानपैकी सजावट करून स्टेज बनवला. या महोत्सवाचा अनुभव घेण्यासाठी व नवीन काहीतरी शिकण्यासाठी पुणे, नाशिक, मुंबई, वापी अशा ठिकाणाहून पाहुणे मंडळी आली होती. मुलांनी काढलेले चित्रं. आलेल्या पाहुण्यांची गावातल्याच घरांमध्ये मोफत व्यवस्था करण्यात आलेली. गावातली माणसं इतकी प्रेमळ आहेत की, त्...

कुंभार्ली घाटातली वाघबारस

इमेज
वाघबारसविषयी मी ऐकून होतो. तलासरी भागात असल्यामुळे इथल्या वाघबारसची कल्पना आहे परंतु कुंभार्ली घाटात होणारी वाघबारस पाहायची उत्सुकता लागली ती सदफची पोस्ट पाहिल्यावर. खरं तर हा मागच्या वर्षीचा(२०२३) अनुभव आहे. चिपळूण येथे राणी आणि सदफ यांच्या सह्याद्री संवर्धन व संशोधन संस्थेत(SCRO) पोचलो. तिथून आम्ही कुंभार्ली घाटच्या दिशेला निघालो. घाटमाथ्यावर किसरुळे, भाटी, केमसी आणि कासारखडकपाडा असे चार धनगर समाजाचे पाडे. त्यातील कासारखडकपाडा येथे वाघबारस साजरी करण्याकरिता तिकडे गेलो. कासारखडक पाड्यात एकूण पाच कुटुंब. साधारण पंचवीसेक लोकसंख्या.  पाड्यातल्या एका मोकळ्या जागेत गावकरी, लहान मुलं आणि वाघबारस बघण्याकरिता मुंबई, पुणे येथून आलेले आम्ही सारे जमलो होतो. वाघबारसकरिता आलेल्या पाहुणे मंडळींनी पाड्यातील लहान मुलांना रंगवायचे होते. थोडक्यात काय तर त्यांनी वाघ, बिबट्या, कोळशिंदा, अस्वल कसे दिसतात या कल्पनेतून मुलांचे चेहरे रंगवायचे होते. सर्वांनी ते केले शिवाय आमच्यातले काही जण स्वतः रंगण्यासाठी इच्छुक झाले. मग तिथल्या मुलांनी आमच्या चेहऱ्यावर वाघ, कोळशिंदा असे चित्र रेखाटले. वाघबारस दिनी पाड्...