पुस्तक परिचय - तोत्तोचान

पुस्तक - तोत्तोचान

लेखिका - तेत्सुको कुरोयानागी

अनुवाद - चेतना सरदेशमुख-गोसावी.

ती तिच्याच विचारात मग्न राहते. पक्षांशी काय बोलते, बाकावर बसून बाहेरच्या लोकांशी गप्पा मारते. इतर मुलांचे लक्ष विचलित करते. अशा अनेक तक्रारी एका शिक्षिकेने तोत्तोचानच्या आईकडे मांडल्या. आता तिला दुसऱ्या शाळेत प्रवेश घ्यायचं म्हटलं तर तिच्या वागण्यात बदल करावा लागेल. जे खूप कठीण होतं. जपानच्या तोमाई शहरात रेल्वेच्या डब्ब्यांची असणारी एक आगळीवेगळी शाळा होती. तिथे तोत्तोचानला घेऊन गेले. तिला तेथील शाळा खूप आवडली पण आपलं कोणी ऐकून घेईल का या चिंतेत ती होती. परंतु घडलं वेगळंच. चार तास मुख्याध्यापकांनी तिचं म्हणणं ऐकून तिला शाळेत प्रवेश दिला. आणि मग पुढे जे काहीच घडलं ते अद्भुतच!


मुलांनी बोलतं असायला हवं, प्रश्न विचारायला हवे, आणि त्यातूनच वेगवेगळे प्रयोग करायला लावणारी ही आगळीवेगळी शाळा. या शाळेत तोत्तोचानचं मन रमलं. एकमेकांना समजून घेतलं विविध प्रयोग केले. मुख्याध्यापकांचं कौतुक असं बरंच काही घडलं. पण हे सगळं घडत असताना जपानवर अमेरिकेकडून बॉम्बचा वर्षाव होत होता. जपान तोमोई शहर संपूर्ण रिकामे होत होते आणि इतक्यात अचानक शाळेवर बॉम्ब आला आणि संपूर्ण शाळा कोसळली. एकेकाळी विविध प्रयोग होणाऱ्या शाळेतून विनाशकारी धूर निघत होते.

मुख्याध्यापक आणि विद्यार्थी आणि पालक यांना खूप वाईट वाटलं. तोत्तोचानचे सोबती सध्या काय करत आहेत हे तिने संक्षिप्तपणे मांडले आहे. ती स्वतः जपानमधील लोकप्रिय दूरदर्शन कलाकार आहे. जपानचे पंतप्रधान सुझुकी यांच्याकडून तसेच इतर संस्थाकडून देखील तोत्तोचानला पुरस्कार मिळाला आहे.


- शैलेश दिनकर पाटील

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पिंपळगाव येथील हरिहरेश्वर मंदिर...

पुस्तक परिचय - सत्तर दिवस

"बाराखडी ज्ञानकेंद्र"