पुस्तक परिचय - सत्तर दिवस

पुस्तक - सत्तर दिवस

लेखक -  रवींद्र गुर्जर

युरुग्वे दक्षिण अमेरिकेतील एक छोटासा देश. त्या देशातील तरुणांनी रग्बी खेळात दोनदा राष्ट्रीय अजिंक्यपद पटकावले होते. यावेळीही ते अजिंक्यपद पटकवण्यासाठीच निघाले होते.

दिनांक १२ ऑक्टोबर १९७२. एअरफोर्सच्या 'फेअर चाईल्ड एफ २२७' ह्या विमानानं पंचेचाळीस प्रवाशांसह आकाशात झेप घेतली. हिमालयसारख्या पर्वत रांगा या भागात आहे. विमान आकाशात झेपत असताना खराब हवामानमुळे त्यांचं विमान कोसळतं. आणि जगाशी संपर्क तुटतो. चहू बाजूने बर्फाच्छदित प्रदेश. यातून सुटका करण्याकरिता चिली, अर्जेंटीना सारखा नजीकचा देश सहकार्य करतो पण तो देखील अपयशी ठरतो.

त्या बर्फाच्छदित प्रदेशात फसलेल्या पंचेचाळीस लोकांपैकी केवळ सोळा जणं जिवंत राहतात. त्या सोळा जणांनी अनुभवलेलं मरण या पुस्तकात कथित केलं आहे. मुबलक जेवण सोबत नाही तसेच संपर्क करण्याकरिता साधन नाही. जिवंत राहण्यासाठी काहीतरी खाणं आवश्यक होतं. म्हणून सोळा जणांनी नरमांस भक्षण करत सत्तर दिवस काढले.

त्या सोळा जणांनी आपापसांत कामे वाटून तेथून बाहेर निघण्याचे प्रयत्न केले आणि त्यातून ते सुटले तब्बल सत्तर दिवसांनी. या सत्तर दिवसांच्या मरणयातनेतून त्यांनी स्वतःची सुटका कशी केली ते अगदी विस्तृत दिलं आहे. 'सत्तर दिवस' वाचताना अनेक प्रश्न निर्माण होतात.

- शैलेश दिनकर पाटील

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पिंपळगाव येथील हरिहरेश्वर मंदिर...

"बाराखडी ज्ञानकेंद्र"