पोस्ट्स

2020 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

खान्देशातील लोकपरंपरा 'वन'

जसे कोकणात 'दशावतार', विदर्भात 'सोंग', आदिवासी भागात 'बोहाडा' त्याचप्रकारे जळगाव जिल्ह्यात 'वहन' ही लोकपरंपरा जपली जाते. चोपडा तालुक्यातील हातेड गावात 'वहन' लोकपरंपरा एक वेगळ्या पद्धतीत साजरी केली जाते. अहिराणी भाषेत 'वहन' शब्दाचा अपभ्रंश होऊन 'वन' या शब्दानेच ही लोककला प्रचलित आहे. जळगावपासून पन्नास किलोमीटर अंतरावर हातेड गाव आहे. या गावातील एकूण लोकवस्ती चार हजार पाचशे. 'वन' ही लोककला पिढ्यानपिढ्या चालत आलेली आहे. पन्नास वर्षांपासून सुरू असलेली ही परंपरा गावात अगदी नियमितपणे सुरू आहे. २००७ सालानंतर या लोककलेत काही कारणांमुळे दोन वर्ष खंड पडला होता. गावातल्या व्यक्तींनी एकत्र येऊन त्यावर विचार केला, की पूर्वापार चालत आलेली परंपरा आपण जपली पाहिजे या हेतूने गावातले लोकं उत्साहाने पुढे आले. २००९ पासून ते आतापर्यंत या लोककलेचे सादरीकरण उत्तमपणे होत आहे. लोककलेत कलाकार मंडळी 'रामलीला' सादर करतात. गावातल्या श्रीराम मंदिरासमोरच त्याचे सादरीकरण होते. एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात सुरू होणाऱ्या रामलीलाचा कालावधी पाच...

लोकसंस्कृती जपणारी माणसं...

इमेज
२२ नोव्हेंबरला आमच्या कार्यालयातील सहकाऱ्यांसोबत दादरा नगर हवेली येथील दुधणी येथे फिरायला गेलो होतो. दुधणी पर्यटन केंद्र असल्यामुळे सुट्टीच्या दिवशी तेथे प्रचंड गर्दी असते. तेथील बोटिंग हे मुख्य आकर्षण. महाराष्ट्र, गुजरात आणि सिल्वासा येथून बरीच माणसं तेथे फिरायला येतात. दुधणीच्या बोटिंग पॉईंटजवळ एक लोकमंच बनवला गेला आहे. आम्ही सहकारी मंडळी फिरत असताना त्या लोकमंचावर विशेष वेशभूषा परिधान करणारा पंधरा-वीस जणांचा समूह पहायला मिळाला. त्यांचं नेमकं काय सुरू आहे हे पाहण्यासाठी त्या लोकमंचाजवळ गेलो. आलेल्या समूहाने पाच मिनिटे विश्रांती करून सादरीकरणाच्या तयारीला लागले. थोड्यावेळासाठी मला शहरात होत असणाऱ्या फ्लॅश मॉब डान्सची आठवण झाली. तारपा नाच करणारे सगळे शाळकरीच विद्यार्थी आणि त्यांच्यासोबतीला त्यांचे पालकदेखील होते. आणि त्यांच्यातले दोन वयस्कर माणसं तारपा आणि तूर वाजविणारे. त्यांतील एकाने तूर वाजविण्यास सुरुवात केले. त्याचा सूर ऐकून फिरायला आलेली माणसं त्या लोकमंचाकडे आकर्षित झाली. तूर आणि थाली वाजविणारा मध्यभागी आणि त्यांच्याभोवताली मुलामुलींनी एकमेकांच्या कंबरेवर हात ठेवत नृत्याला सुरवा...

आदिवासी, जग आणि फिरोजा ताफ्ती

इमेज
  पालघर जिल्ह्याच्या डहाणू शहरातही आदिवासी समाज आहे. त्यांची भाषा, राहणीमान हे सारं कालानुरूप बदलताना दिसत आहे. येणाऱ्या पिढीला त्यांच्या समाजाचे योगदान आणि सांस्कृतिक वारसा समजावा म्हणून डहाणूच्या फिरोजा ताफ्ती १९९० पासून काम करत आहेत. त्यांचा पर्यावरणशास्त्रावर उत्तम अभ्यास आहे. फिरोजा मूळच्या मुंबईच्या. १९७९ साली त्यांचे लग्न डहाणूचे जहांगीर ताफ्ती यांच्याशी झाले आणि त्या डहाणूकर झाल्या. डहाणूच्या गंजाडजवळच पंधरा एकर जागेत त्यांची चिकुची वाडी आहे. तेथे त्या राहतात. चिकूच्या वाडीची संपूर्ण पाहणी त्यांचे पती पाहतात. वाडी जवळपासचा परिसर आणि तेथील संस्कृती फिरोजा यांना खूप भावली त्यामुळे त्या लोकांशी लवकर एकरूप झाल्या. जंगल म्हणजे आदिवासींचेच राज्य. हा समाज निसर्गपूजक आहे. स्वतःच्या गरजा आपण कशा सीमित ठेऊ शकतो हे या लोकांकडून सहज समजते. अशा गोष्टी हेरून येणाऱ्या पिढीला जाणीव निर्माण करून देण्याचं काम त्यांनी हाती घेतलं आहे. दिल्ली येथे इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज(INTACH) नामक संस्था आहे. त्या संस्थेचे काम जगभर सुरू असते. संयुक्त राष्ट्र संघाने INTACH ला २००७ साली...

वन्यजीवांचे रक्षक - सृष्टी आणि सिद्धार्थ

इमेज
बीड जिल्ह्यातील शिरूर गावानजीक तागड गावात सृष्टी आणि सिद्धार्थ सोनवणे या दाम्पत्यांनी वन्यप्राण्यांसाठी अनाथालय सुरू केले आहे. तेथे जखमी व आजारी जीवांवर उपचार केले जातात. सृष्टी-सिद्धार्थ यांना वन्यप्राण्यांविषयीची जाण लहानपणीच झाली. सिद्धार्थ यांच्या गावात भिल्ल समाज आहे. लहानपणी सिद्धार्थ आणि सृष्टी त्या समाजातील मुलांसोबत जंगलात पक्षी मारायला जायचे. त्यात त्यांना आनंद वाटायचा. त्यावेळी दोघांचे वय साधारण सहा-सात वर्ष. ससा, पक्षी पकडणं आणि सापाला हाताळणं त्यांना सहज जमत होतं. या सगळ्यांमुळे त्यांची वन्यप्राण्यांविषयी वाटणारी भीतीच नष्ट झाली. सिद्धार्थ इयत्ता दुसरीत असताना त्यांच्यासोबत एक घटना घडली. जंगलात फिरत असताना त्यांना 'विरुळा' नावाचा साप आढळला. ते पकडण्याचं धाडस त्यांनी केलं पण विरुळाने त्यांच्या बोटाला दंश केला. त्यावेळी गावात सापांविषयी अनेक गैरसमज होते. विरुळाने दंश केल्यावर नदीतलं गढूळ पाणी प्यायचं आणि मोहोळ खायची. हे सगळं सिद्धार्थ यांनी केलं त्यांना काहीच झालं नाही. सापांची माहिती घेत असताना त्यांना नंतर समजलं की तो साप बिनविषारी आहे. सापांविषयी थोडी माहिती मिळाल...

समाजाची भगिनी "निवेदिता"

इमेज
रोजगार हमी योजना, पेसा आणि वनहक्क कायदा या विषयांवर जव्हार येथील 'वयम् चळवळ' काम करते. मिलिंद थत्ते या चळवळीचे प्रमुख आहेत. २०१९ला 'वयम्'ने सोशल मीडियावर एका उपक्रमाविषयी आवाहन केले होते. गावातल्या मुलांबरोबर विविध प्रयोग किंवा खेळाच्या माध्यमातून ज्ञानार्जन करायचे. त्या बदल्यात गावातील मुलं जंगलफेरी आणि वन भोजन घडवून आणतील. ही संकल्पना आवडली. माझे मित्र विकास आणि परमेश्वर यांच्याशी बोलून जव्हार जाण्याची तारीख ठरवली. 'वयम्'च्या कार्यालयात तेथील कार्यकर्त्या निवेदिता यांच्याशी ओळख झाली. त्यांनी सांगितल्यानुसार ठरलेल्या गावात गेलो. दोन दिवस आम्ही निवेदिता यांच्यासोबत गाव आणि जंगलफेरी केली. त्यांचा गावातील लोकांसोबतचा संवाद पाहून कामाविषयीचा प्रामाणिकपणा दिसत होता. निवेदिता मूळच्या पालघर येथील अंबोडे गावच्या. शालेय शिक्षण घेत असतानाच काही तरी वेगळं करायचं असं त्यांनी ठरवलं होतं. घरची परिस्थिती जरा बेताचीच. दोन लहान बहिणी त्यांचा शिक्षणाचा खर्च आणि घर सांभाळणं यासाठी निवेदिता यांनी मेहनत घेतली. बारावी नंतर त्यांनी चार-पाच ठिकाणी नोकरी केली. पण तेथे त्यांचे मन रमले न...

गावरान गोधडीची ऊब सातासमुद्रापार.

इमेज
पुण्याच्या कर्वे समाज सेवा संस्थेने 'सामाजिक बांधिलकी' या उद्देशाने शहापूर तालुक्यातील खराडे गावात काम सुरू केले. हे गाव शहापूरपासून पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे. त्या गावातील एबीएम कातकरी व आदिवासी मुलींची शाळा मुंबई येथील माझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड कंपनीने सामाजिक दायित्वाच्या माध्यमातून दत्तक घेतली. त्या शाळेला शासकीय अनुदान नसल्यामुळे ती बंद पडली होती. शाळा पुन्हा सुरू करण्यासाठी संस्थेच्या संचालकांनी माझगांव डॉक कंपनीला आर्थिक सहाय्य मिळणेबाबत पत्र व्यवहार केला. कंपनीने पुण्याच्या कर्वे समाज सेवा संस्थेशी संपर्क करून त्यांना शाळेची परिस्थिती आणि तेथील गरज जाणून घेण्यास सांगितले. कर्वे संस्थेने शाळेचा पायाभूत सर्व्हे करून आजूबाजूच्या परिसरातदेखील काम करण्याची आवश्यकता आहे असा अहवाल कंपनीस दिला. मार्च २०१५ पासून कंपनीने शाळा दत्तक घेत कर्वे संस्थेला मॉनिटरिंग करण्यास सांगितले. २०१५ ते २०२० या पाच वर्षांत कंपनीने शाळा आणि गावाच्या कामासाठी आर्थिक सहाय्य केले. २०२०मध्येच एबीएम कातकरी व आदिवासी मुलींच्या शाळेला शासकीय अनुदान मंजूर झाले आहे. आरती गिते यांच्यासोबत ऊर्जा महिला...

शूर हाली

इमेज
माझा मित्र स्वप्नील अधिकारी मूळचा शहापुरचा. सामाजिक कामानिमित्त आदिवासी पाड्यांना भेट देत असतो. शहापूर तालुक्यात 'हाली' नामक आदिवासी महिला तिने दाखवलेल्या धाडसामुळे प्रसिद्ध आहे. मागच्या वर्षी(२०१९) स्वप्नील आणि त्याचा मित्र मकरंद घनघाव हालीच्या घरी भेट द्यायला गेले होते. त्यांनी तिला भेट म्हणून साडी-चोळी दिली होती. या भेटीमुळे हालीने दाखवलेल्या शौर्याची आठवण झाली. स्वप्नील आणि मकरंद 'हालीला' साडी चोळी भेट देताना. शहापूर तालुक्याच्या नांदगाव जवळील जमन्याच्या पाड्यातील एका तबेल्यात रघुनाथ बरफ काम करतात. तेथून मिळणाऱ्या पैशांतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. रघुनाथ यांना शकुंतला आणि हाली या दोन मुली. शकुंतला थोरली आणि हाली तिची लहान बहीण. २०१२ सालची घटना आहे. रघुनाथ यांची लहान मुलगी हाली हिने बिबट्याच्या तावडीतून शकुंतलाची(मोठ्या बहिणीची) सुटका केली होती. शकुंतला गर्भवती होती. ती बाळंतपणासाठी माहेरी आलेली होती. शहापूर तालुक्यात तानसा अभयारण्य आहे. तेथे वन्यप्राण्यांचा वावर असतो. या अभयारण्याच्या क्षेत्रात तानसा जलाशय आहे. हे जलाशय मुंबई सारख्या शहराला पाणी पुरवठा करते. पाड्...

'सुवर्ण'वेधी सायली

इमेज
शालेय उपक्रमाच्या निमित्ताने उल्हासनगरच्या महाराष्ट्र मित्र मंडळ या शाळेत माझे जाणे व्हायचे. त्या शाळेतील शारीरिक शिक्षण विषयाचे शिक्षक सपकाळे सर आणि म्हात्रे सर यांच्याकडून सायली भंडारीविषयी ऐकून होतो. तिने वुशू खेळात राज्य पातळीवर सुवर्णपदक पटकावून राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राचं नेतृत्वदेखील केले आहे. सायलीचे वडील दिनेश भंडारी हे शहाड येथील सेंच्युरी रेयॉन कंपनीत नोकरीला आहेत. त्यांनी तरुण वयात मैदानी खेळ खेळले आहेत. देशासाठी एकदा तरी खेळायचे असे स्वप्न त्यांनी मनी बाळगले होते पण त्यावेळी घरच्या परिस्थितीमुळे ते शक्य झाले नाही. स्वतःचे राहिलेले स्वप्न उराशी बाळगून मुलांकडून पूर्ण करण्याचा प्रयत्न ते करत आहेत. दिनेश यांना सायली आणि साहिल ही दोन मुलं. सायली ही मोठी मुलगी. ती चौथीला असताना(२०१४) तिच्या वडिलांनी तिला शाळेतच सेल्फ डिफेन्ससाठी कराटे क्लास लावून दिला. त्यावेळी तिचे कराटेचे प्रशिक्षक भगीरथ सर होते. कराटे शिकता शिकता ती वुशू खेळाची माहिती घेत राहिली आणि प्रशिक्षणाचे धडेही गिरवत राहिली. प्रयत्न म्हणून ती वुशू खेळाच्या स्पर्धेत २०१५ साली उतरली. ती तिची पहिलीच स्पर्धा. 'ऑल ...

आदिवासी भागातील प्रयोगशील शाळा

इमेज
मी शैक्षणिक साहित्य वाटपाच्या निमित्ताने पालघर जिल्ह्याच्या तलासरी तालुक्यातील गिरगाव केंद्राच्या जिल्हा परिषद शाळेला भेट दिली. शाळेतील वर्ग फिरलो आणि शिक्षकांच्या भेटी घेतल्या. वर्ग फिरत असताना, काही गोष्टी नजरेस पडत होत्या. एका वर्गात गेलो, तर तिकडे मंत्रिमंडळाचा एक तक्ता तयार केला होता. त्या तक्त्याकडे पाहिले आणि एक छान गंमत दिसली - मुख्यमंत्री, शिस्तमंत्री, सांस्कृतिकमंत्री, क्रीडामंत्री या पदांपुढे नावे वेगळीच दिसत होती. त्याविषयीची संपूर्ण माहिती शाळेचे मुख्याध्यापक वाघातसर आणि धोडीसर यांच्याकडून घेतली. तेव्हा त्यांनी सांगितले, की त्यांच्या शाळेत विद्यार्थ्यांचे मंत्रिमंडळ आहे. जूनमध्ये शाळा सुरू झाली, की निवडणूक होते. विद्यार्थी स्वेच्छेने निवडणूक लढवण्यासाठी उभे राहतात. विद्यार्थी उमेदवार “मला जर निवडून दिले तर मी शिस्तबद्धपणे आणि व्यवस्थितपणे काम करेन. कोठल्याही पद्धतीचा त्रास देणार नाही.” अशा प्रकारचा प्रचार निवडणुकीला उभा असलेला करत असतो. जिल्हा परिषद शाळा आरजपाडा(गिरगाव) मतदाराने निवडणुकीत चिठ्ठीत उमेदवाराचे नाव लिहून ती चिठ्ठी बॉक्समध्ये टाकायची असते. मतमोजणी सर्व विद्यार्...

बाप्पाला पत्र २०२० - गणेशोत्सव

इमेज
प्रिय गणपती बाप्पा, यावेळी तुझं आगमन आम्ही थाटामाटात करू शकलो नाही याची खंत कायम मनात राहील. इच्छा असूनही काहीच करता येत नाही नाईलाज आहे सगळा. संपूर्ण देशभर कोरोना रोगाची आपत्ती कोसळली आहे. मागच्या वर्षी तर पावसाच्या पाण्याने झोडपले होते. अनेकांचे घर पुरामुळे बुडाले होते. पै पै जमवलेलं सगळं वाहून गेलं. पण नव्या जोमाने आम्ही पुढे आलो आणि संसार पुन्हा नव्याने थाटला. आता सगळं सुरळीत असताना यावर्षी मात्र कोरोनाने वाट लावली. इथे ना नव्याने सुरवात करता येत, ना जवळच्या व्यक्तींना भेटता येतं. लॉकडाऊनमुळे काही जण दूरवर अडकले त्यांना स्वतःच्या घरीही जाता येईना. अशा परिस्थितीत नातेवाईकांकडे पण जाता येईना. आम्ही मोकळा श्वास घेत कोठेही जायचो पण मार्चपासून तोंडाला मास्क आणि सतत हात स्वच्छ ठेवणं हे आता गरजेचंच झालंय. लॉकडाऊनमध्ये रोजंदारीवर काम करणाऱ्या माणसाची तर पूर्णतः वाट लागली आहे. दोन वेळचं जेवण करणारा माणूस आता काटकसरीनंच जगतोय. देशाचा अन्नदाता आपला शेतकरी बांधव त्याने राब राब राबून शेतात पिकं घेतली पण बाजारच बंद असल्यामुळे त्याला हवा तो भाव मिळाला नाही. मग घरात अन्न सडवण्यापेक्षा त्याने अगदी ...

'गुगल' नव्हे तर "गुरू"

इमेज
शिक्षक आणि विद्यार्थी हे नातं जरा वेगळंच असतं. शिक्षकाला सतत वाटत असतं, की आपल्या हातून उत्तम विद्यार्थी घडावा, त्याने त्याचे आयुष्य सार्थकी लावावे. मी उल्हासनगरच्या महाराष्ट्र मित्र मंडळ या शाळेत शिकलो त्या शाळेत अनेक शिक्षकांनी सहकार्य केलं. चांगलं शिकवलं. सगळ्या शिक्षकांमध्ये एक शिक्षक तर खास असतोच. आमच्या शाळेतले उल्हास चव्हाणके सर हे विद्यार्थीप्रिय आहेत असे म्हणायला हरकत नाही. शालेय शिक्षण संपल्यानंतरही ते प्रत्येक विद्यार्थ्यांच्या संपर्कात असतात. कोणाचं काय सुरू आहे कोणी चुकीच्या मार्गाला नाही ना हे सतत तपासत असतात. त्यांनी शैक्षणिक आणि सामाजिक कार्यात महत्वपूर्ण योगदान दिले त्यामुळे २०२० साली 'कोकणरत्न गुणवंत' पुरस्काराने सन्मानित केले. महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेच्या वतीने हा पुरस्कार त्यांना मिळाला. मी फोनवर शुभेच्छा दिल्या त्यांनी त्या स्वीकारल्या नाहीत ते म्हणाले, की 'अरे मी कुठे फार मोठं काम करतो.' मुळात काम दिसतंय म्हणूनच तर त्याचं फळ मिळतंय. चव्हाणके सर महाराष्ट्र मित्र मंडळ या शाळेचे माजी विद्यार्थीच. एक शिक्षक म्हणून त्यांनी विद्यार्थ्यांशी चांग...

जागतिक आदिवासी दिनानिमित्त...

इमेज
आदिवासी म्हटलं की नजरेसमोर येते त्यांची गरिबी, अशिक्षितपणा, अज्ञान वगैरे पण आता परिस्थिती हळूहळू का होईना बदलत चालली आहे. शिक्षक आणि उद्योग या क्षेत्राकडे अधिक प्रमाणात जाताना दिसतोय. संस्थेच्या माध्यमातून स्वयंरोजगाराच्या संधी देखील शोधत आहेत. मी मूळचा कल्याणचा. पण नोकरीनिमित्त २०१५ पासून पालघरच्या तलासरी भागात स्थित आहे. नोकरीचे पत्र मिळाले आणि त्यावर कामाचे ठिकाण नमूद केले होते. पालघर सोडल्यास माझ्यासाठी बाकी ठिकाण नवीन होते. पत्र मिळाल्याच्या दुसऱ्या दिवशी ऑफिसला हजर झालो. तिथली सगळी काम आटोपून बाहेर पडलो तर आजूबाजूचा माहोलच वेगळा होता. लोकांचे राहणीमान, बोलीभाषा पाहून असे वाटायचे की आपण इथे फार काळ टिकणार नाही. याआधी मी काही संस्थांच्या सोबतीला शहापूर, वाडा, विक्रमगड या आदिवासी भागात मदत केलेली आहे. पण तिथल्यापेक्षा हा भाग मला जरा वेगळा वाटला. ऑफिसचं काम आटोपून माघारी निघताना रस्त्यावर भली मोठी गर्दी दिसत होती जोरजोरात गाण्यांचा आवाज. जरा जवळ जाऊन पाहिलं तर ती मिरवणूक जागतिक आदिवासी दिनानिमित्त होती. आदिवासींच्या संस्कृतीशी निगडित सगळ्या गोष्टी त्या मिरवणुकीत पाहायला मिळाल्या. आदि...

Alcoholic people's second home

इमेज
Last year, me and my friends had visited "Mahashramdan" camp arranged by "Paani Foundation" -our little contribution towards drought-free Maharashtra. That was our first experience with "Paani Foundation". We registered online and received SMS. They allotted us a village named as Vadzire located in Sinner Tehsil, Nashik district as our work location. On the evening of 30th April 2019, We have started our journey from Kalyan to Sinnar. We are expected to reach sinner by 12 to 01 am late night , still we did not  decided our halt location. I remembered one of my friend from sinner-Mr. Kiran Bhavsar as we are working together with "Think Maharashtra.com" (an organization which works to collect information about Maharashtrian culture). We discussed our schedule with him and he suggested to visit "Sahara rehabilitation centre" run by Mr. Madhukar Gite, situated in Mendhi village about 25KM from Sinner. He also suggested to visit and explore ...

"Manvata" the Guardian of Humanity...

इमेज
In 2018, major fire breaks out in slum area of Patil Estate, Warje in Pune, Maharashtra. Many houses were burnt in that fire. One of my friend had appealed on Facebook  for helping those people. So I shared his post on my WhatsApp and Facebook wall. A stranger- Mr.Nilesh Bachhav instantly replied on my Facebook post and inquired about the needs. So I told him the required things and in a single day, he managed to collect old clothes and blankets that too in good condition & properly packed. Then he sent those packed boxes to Pune with the help of my friend Mr.Parmeshwar. And thus our friendship started. I went through his facebook posts & got to know that he provides food and medical help to people living on the streets along with his friends -Mr.Kushal and Mr. Sai. Then I had a detailed call with Mr.Nilesh and Mr.Kushal just to get more information about their work. Sai, Nilesh, destitute person, kushal & his friend All three live in ulhasnagar, Thane and are devotees ...