'सुवर्ण'वेधी सायली
शालेय उपक्रमाच्या निमित्ताने उल्हासनगरच्या महाराष्ट्र मित्र मंडळ या शाळेत माझे जाणे व्हायचे. त्या शाळेतील शारीरिक शिक्षण विषयाचे शिक्षक सपकाळे सर आणि म्हात्रे सर यांच्याकडून सायली भंडारीविषयी ऐकून होतो. तिने वुशू खेळात राज्य पातळीवर सुवर्णपदक पटकावून राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राचं नेतृत्वदेखील केले आहे. सायलीचे वडील दिनेश भंडारी हे शहाड येथील सेंच्युरी रेयॉन कंपनीत नोकरीला आहेत. त्यांनी तरुण वयात मैदानी खेळ खेळले आहेत. देशासाठी एकदा तरी खेळायचे असे स्वप्न त्यांनी मनी बाळगले होते पण त्यावेळी घरच्या परिस्थितीमुळे ते शक्य झाले नाही. स्वतःचे राहिलेले स्वप्न उराशी बाळगून मुलांकडून पूर्ण करण्याचा प्रयत्न ते करत आहेत. दिनेश यांना सायली आणि साहिल ही दोन मुलं. सायली ही मोठी मुलगी. ती चौथीला असताना(२०१४) तिच्या वडिलांनी तिला शाळेतच सेल्फ डिफेन्ससाठी कराटे क्लास लावून दिला. त्यावेळी तिचे कराटेचे प्रशिक्षक भगीरथ सर होते. कराटे शिकता शिकता ती वुशू खेळाची माहिती घेत राहिली आणि प्रशिक्षणाचे धडेही गिरवत राहिली. प्रयत्न म्हणून ती वुशू खेळाच्या स्पर्धेत २०१५ साली उतरली. ती तिची पहिलीच स्पर्धा. 'ऑल महाराष्ट्र वुशू असोसिएशन'तर्फे जिल्हा पातळीवर खेळली. पहिल्या खेळात तिचा पराभव झाला. पण त्या खेळातून तिला चांगलाच अनुभव मिळाला. नव्याने मेहनत करून आणि आलेला अनुभव गाठीशी बांधून ती २०१६ साली असोसिएशनतर्फे जिल्हा पातळीवर पुन्हा खेळली. ती स्पर्धा मुंबई येथे खेळली गेली. त्या स्पर्धेत तिने सुवर्ण पदक पटकावले. या पदकामुळे तिला राज्य पातळीवर खेळण्याची संधी मिळाली. काही महिन्यांनी स्पर्धेला सुरवात होणार होती. राज्य पातळीवरील ही स्पर्धा वर्धा येथे संपन्न झाली. त्या स्पर्धेतही तिने कमाल केली. तेथेही सुवर्णपदक पटकावले. जिल्हा आणि राज्य पातळीवर सुवर्णपदक पटकावल्यामुळे राष्ट्रीय पातळीवर खेळण्याची नामी संधी मिळाली. पण घरची आर्थिक परिस्थिती आणि काही कारणांमुळे तेथे जाणं शक्य झालं नाही. सायली निराश झाली पण तिने प्रयत्न मात्र सोडले नाही.
![]() |
| सायली भंडारी |
२०१७ मध्ये ती इयत्ता आठवीत गेली. शाळेतर्फे खेळण्यासाठी सरकारकडून खेळाडूसाठी काही निकष असतात. त्या सगळ्या निकषात सायली बसत होती. शाळेकडून खेळताना जिल्हा-झोनल-राज्य-राष्ट्रीय असा प्रवास असतो. २०१७-१८ मध्ये तिने जिल्हा आणि झोनल पातळीवर सुवर्णपदक पटकावले. मात्र राज्य पातळीवर तिला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. २०१८-१९ साली राज्यपातळीवर तिला रजत पदक मिळाले. २०१९ साली तिची दहावी झाली. खेळ सुरू असताना तिचा शालेय अभ्यास पण सुरूच होता. दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत तिला ऐंशी टक्के गुण मिळाले. शाळेत असताना तिला मुख्याध्यापक धांडे सर आणि इतर शिक्षकांचेदेखील सहकार्य मिळायचे. शारीरिक शिक्षणाचे शिक्षक सपकाळे सर आणि म्हात्रे सर हेदेखील वेळोवेळी तिला मार्गदर्शन करत होते. तीन-चार वर्षे तिने भगीरथ सरांकडे खेळाचे प्रशिक्षण घेतले. सध्या ती मुकेश गणेशकरांकडे प्रशिक्षण घेत आहे. सायली राहायला शहाड येथे. तिचे बंगला वजा घर आहे. घराच्या टॅरेसवरील मोकळ्या जागेत मुकेश गणेशकर यांचा 'डायनॅमिक मार्शल आर्ट' नामक क्लास आहे. या क्लासच्या जागेसाठी सायलीच्या वडिलांनी मदत केली आहे. आपल्या घरातलं किंवा गावातलं खेळामध्ये कोणीतरी उच्च स्तरावर जावं यासाठीही त्यांचा प्रयत्न सुरू आहे.
![]() |
| सायलीच्या कर्तृत्वामुळे तिला उल्हासनगरच्या केसरी मित्रमंडळाने सम्मानीत केले. |
- शैलेश दिनकर पाटील


Motivational activity
उत्तर द्याहटवाNice
उत्तर द्याहटवाKeep it up and congratulations
उत्तर द्याहटवाNice ������������ keep it up congratulations
उत्तर द्याहटवाKeep it up 👍👍
उत्तर द्याहटवाCongratulations 🎊🎉👍👌😊
उत्तर द्याहटवाInspirational 👌🏻😊
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवाKeep it up ❤️❤️
उत्तर द्याहटवाCongratulations🎊🎁🎊
उत्तर द्याहटवाCongratulations sweetheart 💖 🥰
उत्तर द्याहटवाKeep it up 👌👌👍👍
उत्तर द्याहटवाCongrats ��
उत्तर द्याहटवाVery Motivational..Keep it up !
धन्यवाद
हटवाCongratulation 👌👌👌 Nice shailesh
उत्तर द्याहटवाधन्यवाद महेंद्र😊
हटवामस्त मित्रा दिनेश... अभिनंदन
उत्तर द्याहटवाSuper.. shailesh
उत्तर द्याहटवाधन्यवाद 😊
हटवा🙌
उत्तर द्याहटवाSayali proud of you. .. ����I am exicted to see in INDIAN jourcey.... Keep it up dear❣️bappa always with you..... Once again congratulation dear..
उत्तर द्याहटवा