"बाराखडी ज्ञानकेंद्र"

वाचनाची आवड असणाऱ्यांसाठी बाराखडी समूहाने महाराष्ट्र-गुजरात सरहद्दीजवळील उंबरगाव येथे 'बाराखडी ज्ञानकेंद्र' सुरू केलं आहे. तेथे मराठी आणि इंग्रजी पुस्तकं उपलब्ध आहेत. त्यासोबतच आकर्षक दिवाळी अंक, मार्मिक व इतर अंक तसेच शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी 'मुलांचे मासिक', 'वयम' अशी मासिकं उपलब्ध आहेत. सध्या तरी पुस्तक मिळवण्याची सुविधा तलासरी, उंबरगाव इथपर्यंत आहे. ज्ञानकेंद्रात असलेल्या पुस्तकांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.


ज्ञानकेंद्रात उपलब्ध असलेली पुस्तकं..

ज्ञानकेंद्राचे सभासद होण्याकरिता एक नियमावली तयार करण्यात आली आहे. ती पुढीलप्रमाणे :

१. वाचक सभासद होण्यासाठी तुम्हाला तुमच्याकडील एक पुस्तक जमा करावे लागेल अथवा ३०० रुपये अनामत रक्कम म्हणून भरावी लागेल. 

२. सभासदत्व रद्द केल्यास जमा केलेली अनामत रक्कम परत मिळेल.

३. वाचक सभासदाची मासिक फी २० रुपये आहे. 

४. पंधरा दिवसांत पुस्तक जमा करणे.

५. पुस्तकाची काळजी घेणे. पुस्तक फाटल्यास नवीन पुस्तक जमा करावे लागेल.

८८५५८६५४८४ या व्हाट्सअप क्रमांकावर तुम्ही मॅसेज करून पुस्तकं मिळवू शकता.


- शैलेश दिनकर पाटील

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पिंपळगाव येथील हरिहरेश्वर मंदिर...

पुस्तक परिचय - सत्तर दिवस