पोस्ट्स

2022 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

शाळा भेट अन् वाचन संवाद

इमेज
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने प्रत्येक ठिकाणी काहीतरी उपक्रम सुरु होते. अमृतमहोत्सवात आपणही काहीतरी योगदान द्यावं म्हणून आमच्या बाराखडी टीमकडून 'शाळा भेट अन् वाचन संवाद' या उपक्रमाची आखणी करण्याचे ठरवले. बाराखडीच्या माध्यमातून आम्ही शाळांमध्ये विविध उपक्रम राबवत असतो. त्यांतील पुस्तकांची शिदोरी' नामक उपक्रम राबवतो. या उपक्रमात जिल्हा परिषद शाळांना पुस्तकं देऊन त्यांच्याशी त्यावर चर्चा करतो. जिल्हा परिषद आवारपाडा शाळेत पुस्तकांची शिदोरी उपक्रम. मी महाराष्ट्र-गुजरात सरहद्दीजवळील उंबरगाव येथे राहतो. तेथून तलासरी तालुका सतरा किलोमीटर अंतरावर आहे. संपूर्ण तलासरी तालुका पायी फिरायचा आणि या तालुक्यात येणाऱ्या निवडक शाळा-महाविद्यालयांना भेटी देऊन विद्यार्थ्यांशी पुस्तक आणि वाचनासंदर्भात संवाद साधायचा असे ठरले. तालुक्याचा विस्तार अंदाजे सत्तर ते नव्वद किलोमीटर असावा. प्रवास कोठून सुरु करायचा आणि थांबा कुठे घ्यायचा त्याचे नियोजन केले. १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान प्रवास करण्याचे ठरले. आम्ही काम करत असताना जिओलाईफ(Geolife) ऍग्रीटेक नामक कंपनी आमच्या संपर्कात आली त्या कंपनीच...

जुन्या जळगावची १५० वर्षाची रथोत्सवाची परंपरा...

इमेज
कार्तिकी प्रबोधिनी एकादशीच्या निमित्ताने दरवर्षी रथ चौक(जुनं जळगाव) येथे श्रीरामांच्या रथ यात्रेचा मोठा उत्सव होतो. या उत्सवाला दीडशे वर्षांची परंपरा आहे. लोकं हिरीरीने सहभागी होतात. सुरवातीला लहान मुलांनी तयार केलेले रथ आणि त्यांचं वाद्य मंडळ. मग पुढे मोठा रथ, अयोध्याच्या राम मंदिराची प्रतिकृती तयार केलेलं छोटंसं मंदिर आणि त्यामागे एक वाहन त्यात राम, लक्ष्मण, सीता आणि हनुमान असा गेटअप केलेले कलाकार. आणि शेवटी फुलांच्या माळानी सजवलेला मुळ मोठा रथ. रथ ओढून नेण्यासाठी त्याला दोरखंड बांधलेले असतात. तो रथ जनसमुदाय हाताने ओढला जातो. जुनं जळगावच्या आळीतून हा रथ नेला जातो. या रथात श्रीराम, लक्ष्मण, सीता आणि हनुमान यांच्या जुन्या मुर्त्या. श्रीराम, लक्ष्मण आणि सीता यांच्या मुर्त्या असणारा मूळ रथ.  रथ उत्सवाचे आयोजन श्रीराम मंदिर संस्थान करते. या उत्सवात भवानी मातेचे सोंगं नाचवली जातात. ही सोंगं करणारी मंडळी बहुतांशी पुरुषच असतात. चेहऱ्यावर रंग चढवून, मोराचा पिसारा असणारा भला मोठा मुकुट डोक्यावर घेऊन वाद्याच्या तालावर नृत्य करणं. हा उत्सव जेव्हा थांबेल तेव्हा ही सोंगं नृत्य करायचं थांबतात. ...

'उत्सव कलाम' उपक्रम-२०२२

इमेज
बाराखडीच्या माध्यमातून शाळा आणि महाविद्यालयात दरवर्षी 'उत्सव कलाम' उपक्रम राबवत असतो. अब्दुल कलाम यांच्या जयंतीच्या निमित्ताने हा उपक्रम सुरु केला. उपक्रमाचे पहिले वर्ष २०१९ . तलासरी तालुक्यातील काही शाळांमध्ये हा उपक्रम राबवण्यात आला. मुख्य उद्देश होता की विद्यार्थ्यांने अवांतर विषयावर चर्चा केली पाहिजे त्याचे शोध घेतले पाहिजे. म्हणून पहिल्या वर्षी विद्यार्थ्यांना ‘मी शास्त्रज्ञ झालो तर’, ‘मानवाने विज्ञान उपयोगी लावलेला महत्त्वपूर्ण शोध’, ‘भारत आणि अवकाश संशोधन’ आणि ‘भारतीय उपग्रह माहिती व उपयोग’ हे चार विषय दिले होते. विषय जरा कठीणच होते. परंतु काही विद्यार्थ्यांनी उत्तम निबंध लिहिले होते. महत्त्वपूर्ण शोध या विषयात वीज, सायकल, गॅस या विषयांवर लिहिले गेले; पण आम्हाला त्यांतील एक विद्यार्थी असा मिळाला, की त्याने ‘स्क्रू’विषयी माहिती लिहिली. त्याचे नाव मनोहर धोडिया. त्याने त्याच्या निबंधात मांडले होते, की स्क्रूशिवाय पंखा फिरणे शक्यच नाही हे नववीच्या विद्यार्थ्याला सुचणे आम्हाला आनंददायी वाटले. काहींनी कलाम यांच्याविषयी छानपैकी माहिती लिहिली. ‘इस्रो’चे सध्याचे अध्यक्ष के. सीवन ...

"बाराखडी ज्ञानकेंद्र"

इमेज
वाचनाची आवड असणाऱ्यांसाठी बाराखडी समूहाने महाराष्ट्र-गुजरात सरहद्दीजवळील उंबरगाव येथे 'बाराखडी ज्ञानकेंद्र' सुरू केलं आहे. तेथे मराठी आणि इंग्रजी पुस्तकं उपलब्ध आहेत. त्यासोबतच आकर्षक दिवाळी अंक, मार्मिक व इतर अंक तसेच शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी 'मुलांचे मासिक', 'वयम' अशी मासिकं उपलब्ध आहेत. सध्या तरी पुस्तक मिळवण्याची सुविधा तलासरी, उंबरगाव इथपर्यंत आहे. ज्ञानकेंद्रात असलेल्या पुस्तकांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा. ज्ञानकेंद्रात उपलब्ध असलेली पुस्तकं.. ज्ञानकेंद्राचे सभासद होण्याकरिता एक नियमावली तयार करण्यात आली आहे. ती पुढीलप्रमाणे : १. वाचक सभासद होण्यासाठी तुम्हाला तुमच्याकडील एक पुस्तक जमा करावे लागेल अथवा ३०० रुपये अनामत रक्कम म्हणून भरावी लागेल.  २. सभासदत्व रद्द केल्यास जमा केलेली अनामत रक्कम परत मिळेल. ३. वाचक सभासदाची मासिक फी २० रुपये आहे.  ४. पंधरा दिवसांत पुस्तक जमा करणे. ५. पुस्तकाची काळजी घेणे. पुस्तक फाटल्यास नवीन पुस्तक जमा करावे लागेल. ८८५५८६५४८४ या व्हाट्सअप क्रमांकावर तुम्ही मॅसेज करून पुस्तकं मिळवू शकता. - शैलेश दिनकर पाटील

अनाथांची अम्मा...

इमेज
महाराष्ट्र-गुजरात सीमेलगत असलेल्या दहाड गावात 'समारिटन चिल्ड्रन होम' नावाचे अनाथाश्रम आहे. समारिटन म्हणजे 'चांगल्या सेवेचं घर'. या चांगल्या सेवेची सुरवात मुंबईच्या मारिया स्टेल्ला यांनी केली. आश्रमातील मुलं-मुली त्यांना प्रेमाने अम्मा म्हणतात. अम्मा मुळच्या दक्षिण भारतीय पण त्यांचं बालपण आणि शालेय शिक्षण भांडुप येथेच झालं. अम्माच्या वडिलांनी त्यांच्या कुटुंबाला लहानपणीच सोडून दिलं. त्यामुळे त्यांच्या घरची परिस्थिती अगदी बेताची झाली होती. अम्मा आणि त्यांची मोठी बहीण नगरपालिकेच्या शाळेत शिक्षण घेत होते. कमावता माणूस घरात नसल्याने लहानपणीच जबाबदाऱ्या आल्या होत्या. मोठ्या बहिणीने शिकलं पाहिजे म्हणून अम्माने कामाला जायला हवं असा त्यांच्या आईचा आग्रह असायचा. अम्मा शाळेत हुशार होत्या. शाळेतल्या विविध खेळांत त्या सहभागी होत. त्यांच्या आई म्हणायच्या, मोठी बहीण शिकून स्थिरस्थावर झाली की लहान बहिणीला पुढे नेईल. समारिटन चिल्ड्रन होम  अम्मा वयाच्या बाराव्या वर्षी एका साडीच्या दुकानात कामाला लागल्या. सकाळच्या सत्रात शाळा आणि दुपारी काम असं त्यांचं सुरु असायचं. अम्माच्या चौदाव्या वर्ष...

खगोलीय आवड जपणारा अवलिया...

इमेज
माणसाला एखाद्या विशेष क्षेत्राची आवड असते. आणि तो त्या क्षेत्राचा समाजासाठी चांगला वापर करून घेत असतो. अशाच एका गृहस्थाशी परिचय झाला. पालघर जिल्ह्याच्या डहाणू तालुक्यातील कासा गावात राहणारे चंद्रकांत घाटाळ. त्यांचे वय पंचेचाळीस वर्ष. त्यांनी शालेय शिक्षण कासा येथे मराठी माध्यमातूनच पूर्ण केले. शालेय शिक्षण घेत असताना चंद्रकांत यांना अवकाश आणि एलीयन्स या विषयांचे प्रचंड आकर्षण होते. त्यांना त्या विषयीचे सतत प्रश्न पडायचे. अवकाश मोहिमेबाबत एखादी बातमी समजली की ते आवर्जून त्याची सखोल माहिती घेत. त्यांनी पालघरच्या सोनोपंत दांडेकर महाविद्यालयातून कला शाखेची पदवी संपादन केली. शिक्षण सुरु असताना नोकरी शोधण्याचा मार्गही सुरुच होता. त्यांनी चेंबूर येथील महाविद्यालयात बी.एडला प्रवेश घेतला. घर दूर असल्यामुळे ते वरळी येथे राहत. शिक्षण सुरु असताना देखील चंद्रकांत यांचे मन अवकाश निरीक्षणात रमायचे. महाविद्यालयातून त्यासंबंधीचे पुस्तक घेऊन वाचन करायचे. चंद्रकांत घाटाळ शिक्षणासाठी मुंबईत स्थिरावल्यामुळे त्यांना आजूबाजूच्या परिसराची चांगल्यापैकी ओळख झाली होती. वरळीला राहत असल्यामुळे नेहरू तारांगण त्...

स्थलांतरित प्रवासी

इमेज
आज(१८ जून) कामावर जायला निघालो तेव्हा वाटेत एक व्यक्ती दिसला. त्याने त्याच्या बॅगेला भारतीय ध्वज बांधला होता आणि एक छोटी पाटी होती. मला जरा कुतूहल वाटले म्हणून त्याच्याकडे गेलो. त्याची माहिती घेतली. त्याचं नाव नरेश शिजापती. मूळचा नेपाळचा पण कामानिमित्त अहमदाबाद येथे आला. तो अहमदाबाद येथे पनाह फाउंडेशनसोबत नऊ वर्षांपासून काम करत आहे. पनाह फाउंडेशन स्थलांतरितांसाठी(migration) काम करते. कोविड काळात स्थलांतरित झालेल्या लोकांसाठी त्यांनी काम केलं आहे.  प्रवासी नरेश शिजापती नरेश स्वतः स्थलांतरित(migrate) व्यक्ती आहे. चार वेळा त्याला स्थलांतर करावे लागले आहे आणि प्रत्येक ठिकाणी मिळणारा अनुभव वेगळा होता. त्याचं म्हणणं आहे की, कामगार वर्ग दिवसाचा तीनशे रुपये रोजगार कमावतो आहे पण त्याला हवा तसा सन्मान कोठे मिळतो? त्यांना कायम दुय्यम लेखलं जातं. अशा या कामगार वर्गासाठी त्याने संकल्प केला आहे. दहा राज्यातून तो पाच हजार शंभर किलोमीटर प्रवास करणार आहे. हा प्रवास नऊ महिने सुरू राहणार आहे. दहा राज्यच का? तर जेथे स्थलांतरणाचे प्रमाण अधिक आहे अशाच ठिकाणी त्याने जायचे ठरवले आहे. या प्रवासाला १४ जूनपा...

सक्षम गाव डोयापाडा!

इमेज
सृजन यात्रा सुरू होण्याआधी 'वयम्' चळवळीचे विनायक दादा यांना डोयापाडा गावच्या भेटीविषयी सांगितले होते. त्यांनी ते मान्य केले आणि डोयापाडा येथील रघु दादाचा मोबाईल नंबर दिला. पालघर जिल्ह्यातील जव्हार, विक्रमगड येथे 'वयम् चळवळ' काम करते. चळवळीचे मुख्य कार्यालय जव्हार येथे आहे. २०२० साली महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी विक्रमगड तालुक्यातील डोयापाडा गावात भेट देण्यासाठी आले होते अशी बातमी वृत्तपत्र आणि टीव्हीवरील न्यूज चॅनलवर झळकली होती. आता राज्यपाल त्या गावात भेट देण्यासाठी आले म्हणजे त्या गावाने काहीतरी चांगलं काम केलंच असणार. म्हणून त्या गावभेटीचे नियोजन ठरले. गावात ग्रामसभा भरवली होती. गावातले इतर मुद्द्यांसोबत सृजन यात्रेकरू भेट द्यायला येणार आहेत हा मुद्दा देखील निघाला. बाहेरची माणसं गाव पाहायला येणार म्हणून सगळ्यांनी त्या प्रस्तावाला मंजुरी दिली. प्रकाश बरफ आणि रघु यांच्या बरोबर बोलल्यानंतर आमची भेट ठरली. फांगणे येथील आजीबाईंची शाळा बघून झाल्यावर आम्ही डोयापाडाच्या मार्गी निघालो. तीन तासांचा हा प्रवास होता. दुपारी दीडच्या दरम्यान गावात पोहोचलो.  सृजन यात्रेदर...

"बाराखडी-प्रवास अ ते ज्ञ चा..."

इमेज
आम्ही सात मित्रमैत्रिणी मिळून ‘बाराखडी’ नामक एक समूह ए. पी. जे अब्दुल कलाम यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने सुरू केला. प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रात कार्य करण्याचा मानस ठेऊन वाटचाल चालू आहे. तसेच इतरही सामाजिक उपक्रम राबवण्याचा प्रयत्न समूहातर्फे होत असतो. कलाम यांचा जन्मदिवस 'वाचन प्रेरणा दिन' म्हणून साजरा केला जातो. त्याचे औचित्य साधून आम्ही 'उत्सव कलाम' हा उपक्रम घेण्याचे ठरवले. २०१९ साली उत्सव कलाम उपक्रम पार पडला. हा उपक्रम दरवर्षी घेऊयात असे ठरले. २०२१ हे उपक्रमाचे दुसरे वर्ष! वाचनाची आवड असणाऱ्यांसाठी बाराखडी समूहाने महाराष्ट्र-गुजरात सरहद्दीजवळील उंबरगाव येथे ' बाराखडी ज्ञानकेंद्र ' सुरू केलं आहे. तेथे मराठी आणि इंग्रजी पुस्तकं उपलब्ध आहेत. आकर्षक दिवाळी अंक, मार्मिक व इतर अंक तसेच शाळेतल्या मुलां-मुलींसाठी 'मुलांचे मासिक', 'वयम' अशी मासिकं उपलब्ध आहेत. सध्या तरी पुस्तक मिळवण्याची सुविधा तलासरी, उंबरगाव इथपर्यंत आहे. ज्ञानकेंद्रात असलेल्या पुस्तकांची यादी तुम्ही येथे पाहू शकता. 'बाराखडी' समूहातील सदस्य याआधी विविध ठिकाणी वैयक्तिक...

कातकरी वस्तीचे गुलाबी वाडीत रूपांतर

इमेज
सृजन यात्रेच्या  निमित्ताने सामाजिक संस्थांच्या भेटी सुरू होत्या. आम्ही योगेंद्र बांगर यांच्या फांगणे येथील आजीबाईंच्या शाळेला भेट देणार होतो. पण बांगर सर म्हणाले, मुरबाडपासून पाच किलोमीटर अंतरावर एक गुलाबी वाडी आहे तिथे आपण पंधरा-वीस मिनिटं थांबुया. वाडीतल्या लोकांच्या कहाण्या ऐकू. बाहेरच्या ठिकाणचे लोकं भेट द्यायला आलेले पाहून त्यांनाही हुरूप येईल. म्हणून आम्ही मुरबाडमधून शेलारी गावाकडे जाण्याचा रस्ता पकडला. या गावच्या नजीकच गुलाबी वाडी आहे. वाडीत चाललो होतो म्हणून अनेक प्रश्न मनात होते नेमकं हे कसं असेल? काय असेल?   गुलाबी वाडीतील रहिवासी पंधरा मिनिटांत वाडीत पोहोचलो. तिथल्या लहान मुलांनी आम्हा यात्रेकरूंचे स्वागत बँड वाजवून केले. वाडीतच शाळा आहे तेथे लहान मुलं-मुली आणि वाडीतले माणसं एकत्र जमले होते. संध्याकाळची वेळ. शाळेच्या बाहेर भलीमोठी रांगोळी काढली होती. आम्ही येणार आहोत म्हणून वाडीतला स्त्री-पुरुष असा दोन्ही वर्ग गुलाबी रंगाचा पोशाख परिधान करून छान नटले होते. एरव्ही ते त्याच रंगांच्या वेशात असतात. या वाडीला गुलाबी वाडी म्हणण्याचं नेमकं कारण म्हणजे, इथे प्रत्...

"रंगारी अन कलाकारी".. - मधुकर दळवी

इमेज
तलासरी तालुक्याच्या उधवा रस्त्यालगत असलेल्या कासपाडा गावात मधुकर दळवी हे बांबूपासून कलाकुसरीच्या वस्तू बनवतात त्यांची माहिती विनेश  सरांकडून समजली. विनेश सर, मी आणि दिनेश सर त्यांची कलाकुसर पाहण्यासाठी दळवी यांच्या घरी गेलो होतो. कासपाडा आश्रमशाळेच्या समोर एक छोटंसं मातीचं घर आहे. घराच्या बाहेर बाईक लावून आत शिरलो तर दरवाज्याच्या बाहेर मधुकर पेंटर असा फलक लावलेला दिसला. त्यांच्या घरात शिरलो तर दोन्ही भिंतीवर त्यांनी काढलेली चित्र लावलेली होती. जवळपास पन्नासेक चित्र असावीत. ते सगळं पाहून सुखावलो. मधुकर दळवी मधुकर दळवींचा जन्म कासपाड्यातलाच. त्यांचं वय वर्ष त्रेचाळीस. पत्नी आणि दोन मुलं असा त्यांचा परिवार. दोन्ही मुलांचे शिक्षण सुरू आहे. दळवी यांचे शालेय शिक्षण कासपाड्यातच झाले. शिक्षण फारसं नसल्यामुळे नोकरी नाही. शेतीवर उदरनिर्वाह करावा लागायचा. पण स्वतःचा व्यवसाय असावा म्हणून त्यांनी शाळा आणि इमारतीच्या भिंती रंगवण्याचे काम २०१० साली हाती घेतले. दळवींचं अक्षर चांगलं होतं. रंगकाम करत असताना ते थोडंफार ब्रशने लिहिण्याचा प्रयत्न करायचे. आणि तो प्रयत्न यशस्वी व्हायचा. त्यांच्या गावातल...

दिव्यांगांचा आधार..

इमेज
 २०१७ साली झी मराठी वाहिनीवर 'उंच माझा झोका' पुरस्कार सोहळ्यात जव्हारच्या प्रमिलाताई कोकड यांना टीव्हीवर पाहिलं होतं. त्यानंतर जवळपास चार वर्षांनी(२०२१) सृजन यात्रेच्या निमित्ताने त्यांच्या भेटीचा योग आला. दिव्यांग आणि मतिमंद मुलांसाठी त्यांनी जव्हार येथे 'दिव्य विद्यालय' सुरू केले आहे. प्रमिलाताई मूळच्या ठाण्याच्या. त्यांचे शालेय शिक्षण तेथेच झाले. त्यांचे वडील औदुंबर कोकड हे सार्वजनिक खात्यात नोकरीला असल्यामुळे नोकरीच्या सततच्या बदलींमुळे विविध ठिकाणी जावं लागे. या बदलीमुळे प्रमिलाताईंना ठिकठिकाणचा परिसरही अभ्यासावयास मिळे. प्रमिलाताईंनी पुण्याच्या एस.एन.डी.टी. विद्यापीठातून बी.ए. ची पदवी संपादन केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी जोडल्या गेल्या असल्यामुळे तेथील संस्कार त्यांच्यावर झाले होते. समाजाशी एकरूप राहणे त्यांना जोडून घेणे आदि बाबी त्या सहजपणे करत. त्यांनी पुण्याच्या टिळक महाविद्यालयातून 'डिफ अँड डम्ब' हा एक वर्षाचा ट्रेनिंग प्रोग्रॅमचा कोर्स पूर्ण केला.(कर्णबधिर मुलांची भाषा शिकण्यासाठीचा तो कोर्स आहे.) सृजन यात्रेकरूंनी द...