पर्यटनातून स्व:विकास
मध्यंतरी पालघर जिल्ह्यात एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता. आणि त्या तुफानी व्हायरलमूळे त्या गावात पर्यटक वाढत आहेत. मुंबई-अहमदाबाद मार्गालगत असणारे पालघर जिल्ह्यातील कासा गाव. आणि तेथून तीन-चार किमी अंतरावर असलेले वाघाडी गावं. त्या गावात असणारा भीमबांध हे पर्यटन स्थळ. परंतु तेथे पर्यटकांचे येणे फार कमी असायचे. वाघाडी ग्रामपंचायतच्या हद्दीत हे पर्यटन स्थळ येते. या स्थळाची माहिती अनेकांना व्हावी पर्यटक इथे आकर्षित व्हावे याकरिता गावातल्या लोकांना चांगली कल्पना सुचली.
![]() |
| रंगकाम करताना ग्रामस्थ मंडळी. |
भीमबांध जवळ असलेले मोठ-मोठाले दगड. या दगडांवर गावातील काही चित्रकारांनी विविध वारली चित्र काढले आहेत. तेथील कोणत्याही दगडाला न हलवता त्यावर चित्र काढले आहेत. तेथे असणाऱ्या ताडीच्या झाडाला छोटे कुंपण करून उत्तम रंगछटा मांडल्या. पर्यटकांना बसण्याकरिता बांबूचे आसन वजा छप्पर बनवले आहे. लव्हचा चिन्ह देऊन "I LOVE वाघाडी भीमबांध" असा मजकूर लिहिला आहे. तसेच त्या मजकूरच्या बाजूला ताडी कशी काढली जाते याचं एक उदाहरण दाखल मटका तेथे ठेवला आहे. हे दृष्य पाहिल्यावर पर्यटक छायाचित्र घेतल्याशिवाय राहत नाही. ही सर्व कामं ग्रामस्थांनी आवडीने आणि सर्वात म्हणजे स्वतःचा वेळ खर्च करून श्रमदानातून केले आहे.
![]() |
| रंगकामातून ग्रामस्थांनी सजावलेला परिसर. |
वाघाडी गावाचे सरपंच प्रशांत सातवी व ग्रामपंचायत सदस्य योगेश धापसी यांच्याशी संवाद साधल्यावर त्यांनी सांगितले की, आम्ही ग्रामसभेत ठराव मांडला होता आणि तो ठराव सर्वानुमते मंजूर करत पर्यटन स्थळाचा विकास करण्याचं ठरवलं आहे. निधीअभावी त्यांची काही कामं अपूर्ण राहिली आहेत ते ही पूर्ण करण्याचा त्यांचा मानस आहे. भविष्यात इथे गावातील लोकांना रोजगार उपलब्ध होईल या अनुषंगाने ग्रामपंचायत प्रयत्न करत आहेत. शिवाय देणगीदारांच्या माध्यमातून काही सहकार्य मिळाले तर अधिक उत्तम होईल अशी त्यांची आशा आहे. या भीमबांधाविषयी दंतकथा आहे ती तुम्ही येथे वाचू शकता.
© शैलेश दिनकर पाटील


खूपच छान माहिती मिळाली ...धन्यवाद शैलेश जी
उत्तर द्याहटवा