स्विझरलँडकरांची भारत भ्रमंती
अगदी महिनाभरापूर्वी(मार्चमध्ये) डहाणू येथून कोस्टल हायवेने येताना एक दुचाकीस्वार एका सायकलिस्टशी गप्पा मारत होता. कानावर थोडं हिंदी ऐकू आलं. मला वाटलं डेली रुटीन करणारे सायकलिस्ट असतील. शंभर मीटर पुढे गेलो तर आणखी दोघे जणं मागच्याची वाट पाहत होते. त्यांच्या चेहऱ्यापट्टीवरून ते भारतीय वाटत नव्हते. मग नेहमी प्रमाणे कुतूहल वाटलं आणि विचारणा करण्यासाठी खाली उतरलो. आणि गप्पा सुरु झाल्या.
हे तिघेही सायकलिस्ट. मूळचे स्विझरलँडचे. विर्जील, इयान तिसऱ्याचं नाव जरा कठीण होतं त्यामुळं नेमकं आठवत नाही. त्यांनी त्यांच्या(फ्रेंच) एक्सेन्टमध्ये सांगितल्यामुळे नीट समजलं नाही. आमचा संवाद तोडक्या मोडक्या इंग्रजीत झाला. पण त्यांचा मुळ उद्देश समजावा म्हणून विकासला फोन करून त्यांच्याशी संवाद साधायला सांगितला. आणि मी इयानकडून माहिती घेत होतो. इयान ऑनलाईन माध्यमातून हिंदी शिकण्याचा प्रयत्न करतोय. कारण प्रत्येक राज्यात संवाद साधण्यासाठी त्याला ती सोपी जाऊ शकेल.
![]() |
| मी, कामिनी, नित्या आणि तिघे सायकलिस्ट.. |
कोव्हीडच्या आधी इयान शिक्षणासाठी भारतात आला होता. आय.आय.टी. कानपुर येथे त्याने शिक्षण घेतले. तेव्हा थोडा का होईना भारत पाहिला होता. त्याने मित्रांशी बोलून ठरवले कि आपण भारत भ्रमंती करूयात ते ही सायकलवर. त्याचे दोघे मित्र तयार झाले. त्याच्या दोन्ही मित्रांनी स्विझरलँडमधून मास्टर्स पूर्ण केलं आहे. इयानने त्यांना कल्पना ऐकवल्यावर ते दोघेही तयार झाले.
संपूर्ण प्रवास नियोजनबद्ध तयार केला. मुंबई ते हिमाचलप्रदेश असा १८० दिवसांचा प्रवास त्यांनी सायकलवर करण्याचं ठरवलं. या प्रवासाच्या माध्यमातून गावं फिरण्याचा आणि भारतीय संस्कृती अभ्यासण्याचा त्यांचा प्रयत्न असणारं आहे. रस्त्याच्या कडेला कोठेही तंबू ठोकून ते राहतात शक्यतो जेवणही बाहेरच बनवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. परवा त्यांच्या इंस्टावर अपडेट पाहिल्या बहुतेक राजस्थान सोडलं त्यांनी.
© शैलश दिनकर पाटील

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा