'व्यसनाधीन' माणसांना मिळतो येथे ''सहारा''
मागच्या वर्षी मी आणि माझे मित्र पाणी फाउंडेशनच्या महाश्रमदान शिबिराला गेलो होतो. पाणी फाउंडेशनसोबत काम करण्याचा आमचा तो पहिलाच अनुभव होता. ऑनलाईन नोंदणी केली आणि आम्हाला मॅसेज आला. सिन्नर तालुक्यातील वडझिरे गाव येथे आम्हाला श्रमदानासाठी जायचे होते. ३० एप्रिलच्या संध्याकाळी आम्ही कल्याण येथून सिन्नरकडे निघालो होतो. रात्री १२-०१ च्या दरम्यान सिन्नरला पोहोचणार होतो. थांबायचे कोठे हे अजून ठरले नव्हते. थिंक महाराष्ट्रच्या माहिती संकलन मोहिमेमुळे सिन्नरच्या किरण भावसार यांच्याशी चांगलाच परिचय झाला होता. त्यांना आमचे नियोजन कळवले. त्यांनी एक सल्ला दिला. सिन्नरपासून पंचवीस किलोमीटर अंतरावर मेंढी गाव आहे. तेथे मधुकर गीतेंचं 'सहारा व्यसनमुक्ती केंद्र' आहे. त्या केंद्राला भेट द्या आणि त्यांचे काम पहा. तिकडे तुमची सगळी व्यवस्था होईल. रात्री साडेदहा दरम्यान गीतेंना फोन केला आणि आम्ही संस्थेला भेट द्यायला येतोय असे कळवले. गीतेंनी अगदी मनापासून स्वागत केले ते म्हणाले तुम्ही या जेवणाची आणि झोपण्याची व्यवस्था करतो. जेवणापेक्षा आम्हाला हवी होती झोप. कारण दुसऱ्या दिवशी श्रमदान आणि आणखी एका संस्थेला भेट द्यायची होती. आम्ही रात्री दीड वाजता मेंढी गावात पोहोचलो. गावाच्या हद्दीवरच सहारा व्यसनमुक्ती केंद्र आहे. गाडीतून उतरून गीतेंना भेटलो. कल्याणवरून कोणीतरी आपल्या संस्थेला भेट द्यायला आले आहे हे पाहून गीतेंच्या चेहऱ्यावर फारच तेज दिसत होते.
सहारा कार्यालयात बसलो चहा-पाणी घेत गप्पा सुरु झाल्या. गीतेंची लहानपणापासून शिक्षक होण्याची इच्छा होती. बोईसर एमआयडीसी विभागात त्यांनी नोकरी केली. पालघरचा बराचसा आदिवासी भाग त्यांना परिचित आहे. गीतेंना नवनवीन गोष्टी शिकून घेण्याची खूप आवड आहे हे सतत त्यांच्या बोलण्यावरून समजत होते. वाढती लोकसंख्या, व्यक्तिमत्व विकास आणि अंधश्रद्धा निर्मूलन याविषयांवर ते शाळा आणि इतर ठिकाणी जनजागृती करत. गीतेंच्या जीवनात एक काळ असा आला, की त्यांना व्यसनाने जखडून घेतले. दारूचे व्यसन त्यांना लागले. आपण जे काही करतो ते वाईट आहे याची जाणीव त्यांना होत होती. आपल्याला लागलेले व्यसन सुटावे म्हणून ते मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रात गेले. तेथे जाऊन त्यांच्यात थोडाफार बदल झाला. दररोज प्यायचे ते महिन्यातून एकदाच प्यायला लागले. हळूहळू दारू पिणे बंद झाले. पण आपण दारू कधी सोडली याची तारीख त्यांच्या पक्की लक्षात होती. २००० साली त्यांची कार्यक्रमाच्या निमित्ताने नरेंद्र दाभोळकरांशी भेट झाली आणि त्या भेटीत गीतेंचे आयुष्यच बदलले. गीतेंनी दाभोळकरांना सांगितले, की मी अमक्या दिवसापासून दारू सोडली आहे. दाभोळकर म्हणाले, 'तुम्ही दररोज प्या किंवा महिन्यातून एकदा प्या शेवटी व्यसन ते व्यसन आणि दारू सोडल्याची तारीख लक्षात ठेवली तर ते व्यसन कधी सुटत नाही.' हेच वाक्य गीतेंनी मनात ठेवून ती तारीख तिथेच विसरून पुढच्या कामाला लागले. व्यसनाने माणसाची परिस्थिती खालावते. घराची नासाडी होते हे सगळं होऊ नये म्हणून व्यसनाच्या आहारी गेलेल्या लोकांसाठी त्यांनी त्यांच्याच मेंढी गावात बाबा आमटेंना प्रेरणास्थान मानून सहारा व्यसनमुक्ती केंद्र सुरू केलं. स्वतःचा आलिशान बंगला असून पत्र्याच्या खोलीत ते राहतात. त्या बंगल्याचा वापर त्यांनी व्यसनमुक्ती केंद्रासाठी सुरू केला. सुरवातीला गावाचा खूपच विरोध झाला पण गीते सांगत होते, की आता इतका बदल झाला आहे की गावातले लोकं सहारासाठी स्वतःच्या जमिनीचा काही भागही द्यायला तयार आहेत. गीतेंच्या जीवनातला प्रवास ऐकता ऐकता आमची झोप अक्षरशः पळून गेली होती. केंद्राच्या सभागृहात आम्हाला घेऊन गेले. केंद्राला सहकार्य करणाऱ्या सगळ्यांचे नाव छायाचित्रांसहित त्यांनी पोस्टरच्याद्वारे लावले आहे. आमटे कुटुंबियांच्या आनंदवनकडून गीतेंच्या कार्याची दखल घेत त्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. 'पत्नीची गरज का आहे?' या कवितेचे फलकही तेेथे आहे. त्या फलकाच्या शेजारी आणखी एक फलक होते. त्यावर छोटी प्रार्थना लिहिलेली आहे ती दररोज सकाळी केंद्रात असलेल्या लोकांकडून बोलून घेतली जाते. त्याच फलकाच्या कोपऱ्यात एक छोटंसं वाक्य आहे ते फार आवडलं. "इथे आशा मिळते जाताना थोडी घेऊन जा."
प्रार्थना
देवा...
जी परिस्थिती मी बदलू शकत नाही, ती स्वीकारण्यास मनाची प्रसन्नता मला दे. जी परिस्थिती, मी बदलू शकतो, ती बदलण्याचे धैर्य मला दे व त्यांच्यामधील भेद जाणण्याचे ज्ञान मला दे.
व्यसनाच्या आहारी गेलेल्या माणसांसाठी त्यांनी वाचनाची व्यवस्थाही करून ठेवली आहे. जवळपास सोळाशे पुस्तके उपलब्ध आहेत. तेथे असलेला व्यसनाधीन माणूस पुस्तक वाचत असतो. बीड, परभणी, मुंबई, बोईसर, नाशिक येथून ही लोक या केंद्रात आली आहेत. तेथील माणसं स्वतः काम करतात. कार्यालयातील कामे, गाईचं दूध काढण्यापासून ते गवत काढण्यापर्यंत सगळी काम ते करतात. पत्रावळी बनवतात. बायोगॅसचा प्रकल्प त्यांनी उभा केला आहे. सौर ऊर्जेचा वापर ते करत असतात. पाण्याचे फिल्टरेशन करून त्याचा पुनर्वापर देखील चांगल्या पद्धतीने केले आहे. प्रत्येक गोष्ट गीतेंनी अगदी विचारपूर्वक साधली आहे. गीतेंनी पुढील तीन वर्षात तयार होणाऱ्या नवीन प्रकल्पाबद्दलही सांगितले. तनपुरे यांच्या सोबतीने ते स्पर्धा परीक्षा केंद्र उभारणार आहेत. शिवाय त्यात अंध-अपंगांच्या सोबतीनेच वैश्या व्यवसायातील स्त्रियांच्या मुलामुलींना शिकवण्याचे व आत्मनिर्भर करण्याचे काम करणार आहेत. हे सगळे धडे त्यांना या केंद्रात मिळतील. गीतेंची ही भन्नाट कल्पना अगदी मनोमन पटली. शिक्षक होण्याची स्वप्न ते पाहत होते पण साक्षात एका शिक्षकी पेशातच सगळं काम सुरू आहे.
पहाटे तीन पर्यंत आमच्या गप्पा सुरु होत्या. गीतेंनी त्यांच्या केंद्रातील एका खोलीत झोपण्याची व्यवस्था केली होती. केंद्रातील लोकांना सकाळी साडेचार वाजता उठायला सांगितले होते. आम्हालाही त्याच वेळेत उठणे होते. तासभर झोप घेतल्यानंतर अगदी वेळेत त्यांचा माणूस आम्हाला उठवायला आला. फ्रेश झाल्यानंतर केंद्रातील सभागृहकडे गेलो. जे पाहिलं ते सगळं अनपेक्षित होतं. केंद्रातील सगळी माणसं स्वागतासाठी बसली होती. गीतेंनी त्यांच्या मनाचा मोठेपणा दाखवत आम्हा चौघांचे स्वागत केंद्रातील लोकांकरवी केला. केंद्रातील लोकांनी आधीची परिस्थिती आणि येथे आल्यानंतर त्यांच्यात झालेला बदल हा सगळा अनुभव कथन केला. अनुभव सांगतांना स्वतःची ओळख ते 'मी एक बेवडा' अशीच करून देत होते. हे पाहून जरा वेगळंच वाटलं. पण या केंद्रात आल्यानंतर त्यांच्यात झालेला बदल पाहून आनंदही वाटत होता. गीते त्यांचा एक अनुभव सांगतात, एका कुटुंबाने त्यांच्या घरातील दारुड्या माणसाला सहारामध्ये आणून सोडलं आणि सांगितलं की हा मेला तरी आमच्या घरी आणू नका आणि आम्हाला सांगू नका. पण सहारामध्ये त्या माणसावर व्यवस्थित उपचार करून त्या माणसाला अगदी ठणठणीत केले. आणखी बदल घडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. वेळ पहाटे पाचची रात्रभर गीतेही झोपले नव्हते. पण तरीही गीतेंच्या चेहऱ्यावरील तेजी कमी झालेली कोठेही दिसली नाही. त्यांच्या पत्नीही तेथे उपस्थित होत्या. या दोन्ही दाम्पत्यांकडे पाहून मला क्षणभर प्रकाशदादा आणि साधनाताई आमटे यांची आठवण झाली. स्वतःकडील सोने विकून, मोठ्या बंगल्यात राहायचे सोडून एका पत्र्याच्या खोलीतच स्वतःची व्यवस्था करून व्यसनाच्या आहारी गेलेल्या माणसांची सेवा करणे ही काही साधी बाब नाही. कौतुक करावे तर संपूर्ण कुटुंबाचे त्यांच्या मुलीनेही त्यांना समजून घेतले. आदर्श मुलगा आणि सून यांनी सहकार्य केले. गीतेंच्या कुटुंबातील साधेपणा बरंच काही शिकवून जातो. गीतेंचा निरोप घेऊन आम्ही पहाटे सहा वाजता आमच्या मार्गी निघालो. कधी सिन्नरला गेलात तर या व्यसनमुक्ती केंद्राला अवश्य भेट द्या.
- शैलेश दिनकर पाटील
![]() |
| केंद्राविषयी माहिती सांगताना मधुकर गीते. |
सहारा कार्यालयात बसलो चहा-पाणी घेत गप्पा सुरु झाल्या. गीतेंची लहानपणापासून शिक्षक होण्याची इच्छा होती. बोईसर एमआयडीसी विभागात त्यांनी नोकरी केली. पालघरचा बराचसा आदिवासी भाग त्यांना परिचित आहे. गीतेंना नवनवीन गोष्टी शिकून घेण्याची खूप आवड आहे हे सतत त्यांच्या बोलण्यावरून समजत होते. वाढती लोकसंख्या, व्यक्तिमत्व विकास आणि अंधश्रद्धा निर्मूलन याविषयांवर ते शाळा आणि इतर ठिकाणी जनजागृती करत. गीतेंच्या जीवनात एक काळ असा आला, की त्यांना व्यसनाने जखडून घेतले. दारूचे व्यसन त्यांना लागले. आपण जे काही करतो ते वाईट आहे याची जाणीव त्यांना होत होती. आपल्याला लागलेले व्यसन सुटावे म्हणून ते मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रात गेले. तेथे जाऊन त्यांच्यात थोडाफार बदल झाला. दररोज प्यायचे ते महिन्यातून एकदाच प्यायला लागले. हळूहळू दारू पिणे बंद झाले. पण आपण दारू कधी सोडली याची तारीख त्यांच्या पक्की लक्षात होती. २००० साली त्यांची कार्यक्रमाच्या निमित्ताने नरेंद्र दाभोळकरांशी भेट झाली आणि त्या भेटीत गीतेंचे आयुष्यच बदलले. गीतेंनी दाभोळकरांना सांगितले, की मी अमक्या दिवसापासून दारू सोडली आहे. दाभोळकर म्हणाले, 'तुम्ही दररोज प्या किंवा महिन्यातून एकदा प्या शेवटी व्यसन ते व्यसन आणि दारू सोडल्याची तारीख लक्षात ठेवली तर ते व्यसन कधी सुटत नाही.' हेच वाक्य गीतेंनी मनात ठेवून ती तारीख तिथेच विसरून पुढच्या कामाला लागले. व्यसनाने माणसाची परिस्थिती खालावते. घराची नासाडी होते हे सगळं होऊ नये म्हणून व्यसनाच्या आहारी गेलेल्या लोकांसाठी त्यांनी त्यांच्याच मेंढी गावात बाबा आमटेंना प्रेरणास्थान मानून सहारा व्यसनमुक्ती केंद्र सुरू केलं. स्वतःचा आलिशान बंगला असून पत्र्याच्या खोलीत ते राहतात. त्या बंगल्याचा वापर त्यांनी व्यसनमुक्ती केंद्रासाठी सुरू केला. सुरवातीला गावाचा खूपच विरोध झाला पण गीते सांगत होते, की आता इतका बदल झाला आहे की गावातले लोकं सहारासाठी स्वतःच्या जमिनीचा काही भागही द्यायला तयार आहेत. गीतेंच्या जीवनातला प्रवास ऐकता ऐकता आमची झोप अक्षरशः पळून गेली होती. केंद्राच्या सभागृहात आम्हाला घेऊन गेले. केंद्राला सहकार्य करणाऱ्या सगळ्यांचे नाव छायाचित्रांसहित त्यांनी पोस्टरच्याद्वारे लावले आहे. आमटे कुटुंबियांच्या आनंदवनकडून गीतेंच्या कार्याची दखल घेत त्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. 'पत्नीची गरज का आहे?' या कवितेचे फलकही तेेथे आहे. त्या फलकाच्या शेजारी आणखी एक फलक होते. त्यावर छोटी प्रार्थना लिहिलेली आहे ती दररोज सकाळी केंद्रात असलेल्या लोकांकडून बोलून घेतली जाते. त्याच फलकाच्या कोपऱ्यात एक छोटंसं वाक्य आहे ते फार आवडलं. "इथे आशा मिळते जाताना थोडी घेऊन जा."
प्रार्थना
देवा...
जी परिस्थिती मी बदलू शकत नाही, ती स्वीकारण्यास मनाची प्रसन्नता मला दे. जी परिस्थिती, मी बदलू शकतो, ती बदलण्याचे धैर्य मला दे व त्यांच्यामधील भेद जाणण्याचे ज्ञान मला दे.
![]() |
| व्यसनमुक्ती केंद्रातील माणसं |
![]() |
| गीते दाम्पत्यांसोबत आम्ही चौघे |
पहाटे तीन पर्यंत आमच्या गप्पा सुरु होत्या. गीतेंनी त्यांच्या केंद्रातील एका खोलीत झोपण्याची व्यवस्था केली होती. केंद्रातील लोकांना सकाळी साडेचार वाजता उठायला सांगितले होते. आम्हालाही त्याच वेळेत उठणे होते. तासभर झोप घेतल्यानंतर अगदी वेळेत त्यांचा माणूस आम्हाला उठवायला आला. फ्रेश झाल्यानंतर केंद्रातील सभागृहकडे गेलो. जे पाहिलं ते सगळं अनपेक्षित होतं. केंद्रातील सगळी माणसं स्वागतासाठी बसली होती. गीतेंनी त्यांच्या मनाचा मोठेपणा दाखवत आम्हा चौघांचे स्वागत केंद्रातील लोकांकरवी केला. केंद्रातील लोकांनी आधीची परिस्थिती आणि येथे आल्यानंतर त्यांच्यात झालेला बदल हा सगळा अनुभव कथन केला. अनुभव सांगतांना स्वतःची ओळख ते 'मी एक बेवडा' अशीच करून देत होते. हे पाहून जरा वेगळंच वाटलं. पण या केंद्रात आल्यानंतर त्यांच्यात झालेला बदल पाहून आनंदही वाटत होता. गीते त्यांचा एक अनुभव सांगतात, एका कुटुंबाने त्यांच्या घरातील दारुड्या माणसाला सहारामध्ये आणून सोडलं आणि सांगितलं की हा मेला तरी आमच्या घरी आणू नका आणि आम्हाला सांगू नका. पण सहारामध्ये त्या माणसावर व्यवस्थित उपचार करून त्या माणसाला अगदी ठणठणीत केले. आणखी बदल घडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. वेळ पहाटे पाचची रात्रभर गीतेही झोपले नव्हते. पण तरीही गीतेंच्या चेहऱ्यावरील तेजी कमी झालेली कोठेही दिसली नाही. त्यांच्या पत्नीही तेथे उपस्थित होत्या. या दोन्ही दाम्पत्यांकडे पाहून मला क्षणभर प्रकाशदादा आणि साधनाताई आमटे यांची आठवण झाली. स्वतःकडील सोने विकून, मोठ्या बंगल्यात राहायचे सोडून एका पत्र्याच्या खोलीतच स्वतःची व्यवस्था करून व्यसनाच्या आहारी गेलेल्या माणसांची सेवा करणे ही काही साधी बाब नाही. कौतुक करावे तर संपूर्ण कुटुंबाचे त्यांच्या मुलीनेही त्यांना समजून घेतले. आदर्श मुलगा आणि सून यांनी सहकार्य केले. गीतेंच्या कुटुंबातील साधेपणा बरंच काही शिकवून जातो. गीतेंचा निरोप घेऊन आम्ही पहाटे सहा वाजता आमच्या मार्गी निघालो. कधी सिन्नरला गेलात तर या व्यसनमुक्ती केंद्राला अवश्य भेट द्या.
- शैलेश दिनकर पाटील

यालाच बदल म्हणतात. असे बदल समाजासाठी खूप गरजेचे आणि महत्वाचे आहेत...����
उत्तर द्याहटवाअक्षय, होय.
हटवाप्रतिकिया दिल्याबद्दल धन्यवाद
हा लेख वाचताना मी तिथेच आहे असं वाटत होतं.
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवाअप्रतीम..
उत्तर द्याहटवाप्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद
हटवाछान लेख
उत्तर द्याहटवामस्तच...👌
उत्तर द्याहटवाप्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद
हटवाखूप मस्त लिहिलंय. पुन्हा एकदा तो अविस्मरणय प्रवास पुन्हा डोळ्यासमोर उभा राहिला.पुढील प्रवास लवकरच पोस्ट करा. आणि परत एकदा असा प्रवास करायची संधी भेटली तर खूप छान वाटेल.
उत्तर द्याहटवादीपक,
हटवाप्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. कोरोनामुळे यावर्षी संधी हुकली पुढच्यावर्षी नक्की जाऊयात.