पोस्ट्स

2021 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

उत्सव कलाम' उपक्रम-२०२१

इमेज
डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीच्या निमित्ताने बाराखडीच्या माध्यमातून शाळांमध्ये दरवर्षी ' उत्सव कलाम' उपक्रम साजरा केला जातो. ' उत्सव कलाम ' उपक्रमाचे हे दुसरे वर्ष. या उपक्रमाअंतर्गत निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. जेणेकरून विद्यार्थ्यांकडून काहीतरी विशेष माहिती प्रदान होईल. एखाद्या विषयावर विचार करण्यास स्वतःला भाग पाडले. दीड वर्ष कोरोना आपत्तीमुळे शाळा, महाविद्यालय बंद होते. पहिल्या वर्षात(२०१९) ठराविक दोन-तीन शाळांमध्ये हा उपक्रम राबविला गेला होता. पण यावर्षी या उपक्रमाची व्याप्ती वाढवू असे ठरले. बाराखडी उपक्रमाची रूपरेषा ठरली गेली. आधी शाळांना सहभागी करायचो पण आता महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना देखील सहभागी करण्याचे ठरवले. कोरोना आपत्तीने बरंच काही शिकवल्यामुळे कोरोना सारखाच विषय घेऊन स्पर्धा घेण्याचे ठरले. पहिल्या गटातील क्रमांक पटकावलेले विद्यार्थी कोरोना आणि विज्ञान(कोरोनामध्ये विज्ञानाचा झालेला उपयोग), कोरोना आजार १९ व्या शतकात आला असता तर..., भविष्यात कोरोनासारखे आजार टाळण्यासाठी विज्ञान कसे सज्ज करणार? असे विषय विद्यार्थ्यांना देण्यात आले. ...

आदिवासी भागातील विद्यार्थ्यांची विश्वविक्रमी नोंद विद्यार्थी

इमेज
'डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन' आणि 'स्पेस झोन ऑफ इंडिया' द्वारा आयोजित "स्पेस रिसर्च पेलोड क्यूब्ज चॅलेंज २०२१" या स्पर्धेत पालघर जिल्ह्यातील एकोणतीस विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. कलाम इंटरनॅशनल फाउंडेशनचा शंभर पेलोड उपग्रह हेलिअम बलूनद्वारे बनवून अवकाशात नेण्याचा त्यांचा प्रकल्प होता. हा प्रकल्प ०७ फेब्रुवारी २०२१ रोजी रामेश्वरम येथे पार पाडला गेला. हा उपक्रम डॉ. ए.पी.जे कलाम कुटुंबियांद्वारे राबविला जातो. विद्यार्थ्यांना अवकाश संशोधनात रुची निर्माण व्हायला हवी. भविष्यात त्यांनी हे क्षेत्रही निवडले पाहिजेत यासाठी त्यांचा प्रयत्न आहे. रानशेत आश्रमशाळेतील अंजु कमलाकर भोईर सहभागी विद्यार्थिनी उपग्रह म्हणजे काय? तो नेमका कसा बनवला जातो? त्याचे विविध भाग कोणते? आणि त्याचं नेमकं कार्य काय? हेलिअम बलून म्हणजे काय? तो सेन्स कसा करणार आहे? या सर्व बाबींचे प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना देण्यात आले. २५ ग्रॅम ते ८० ग्रॅम वजनाचे शंभर उपग्रह बनवून आणि त्यांना पस्तीस हजार ते अडतीस हजार मीटर उंचीवर 'हाय अल्टीट्यूड सायंटिफिक बलून' द्वार...

पराक्रमी बिरसा

इमेज
भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात अनेक क्रांतिकारक लढले. भारतात विविध ठिकाणी उठावही झाले. हे सारे सुरू असताना आदिवासी बांधवांचेही छोटमोठे उठाव सुरू होते. भारतीय स्वातंत्र्य चळवळीत बिरसा मुंडा यांचे नाव आवर्जून घेतले जाते. बिरसा यांचा जन्म १५ नोव्हेंबर १८७५ साली झारखंडच्या रांची येथील उलीहातू गावात झाला. त्यांचे शिक्षण जर्मन मिशनरी स्कुलमध्ये झाले. त्यांनी तरुण वयात अनेक समविचारी मित्रांना एकत्र केलं. आदिवासींवर होणाऱ्या अत्याचारासाठी आपण इंग्रजांविरुद्ध बंड पुकारले पाहिजे यासाठी त्यांनी अनेक तरुणांना संघटित केले.  बिरसा मुंडा संघटन करून उलगुलानची घोषणा केली. उलगुलान म्हणजे प्रचंड उलथापालथ, हल्लाबोल. शोषणाविरुद्ध, स्वतःच्या हक्कासाठी, खोट्या आरोपांच्या विरुद्ध उलगुलान, उलगुलान, उलगुलान... अशी ही उद्घोषणा. आदिवासी साहित्यात मुंडारी बोलीत बिरसा यांच्या पराक्रमाविषयी एक गीत लिहिलेले आहे. कैसा लियो हिंदुस्थान रे बिरसा कैसा लियो हिंदुस्थान ।।धृ।। बिरसा के हाथो में दो दो बंदूक थे । बिरसा के हाथो में दो दो तलवार थे । कमठे पे चढा दियो तीर नावे बिरसा रे । कैसा लियो हिंदुस्थान । हे वाचलं की स्फुरण ...

जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिनाच्या निमित्ताने

इमेज
बाराखडी संस्थेच्या माध्यमातून आम्ही आदिवासी भागातील शाळांमध्ये विविध उपक्रम राबवतो. विद्यार्थ्यांना वेगळ्या विषयावर लिहिण्यासाठी उद्युक्त करत असतो. मुलांसमोर रिसर्च टाईप विषय मांडण्याचा प्रयत्न करतो. त्यांचे गट करून, इमारत कशी बांधली जाते?, रस्ता कसा तयार करतात? अशा प्रकारच्या विषयावर त्यांना लिहायला सांगतो. मुलींसाठी 'मासिक पाळी' हा कॉमन विषयच घेतो. कारण हल्ली मासिक पाळीवर फारसं बोललं जात नाही. पुरुषमंडळींसमोर देखील हा विषय मोकळेपणाने चर्चिला जात नाही. मागच्या वर्षी शालेय साहित्य वाटप उपक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थिनींना 'माझी पहिली मासिक पाळी', 'मासिक पाळी-अंधश्रद्धा', 'मासिक पाळी अनुभव' या विषयांवर लिहिण्यास सांगितले. त्यांनी ते कागदावर अगदी मुक्तपणे मांडले. मासिक पाळीविषयी गावपाड्यांमध्ये अजूनही बऱ्याच अंधश्रद्धा पाळल्या जातात. त्यांना वेगळ्या खोलीत बसवणं, देवाला न शिवणं, जेवण आणि झोपण्यासाठी वेगळ्या खोलीची व्यवस्था करणं, तिच्या हातचे काही खायचे नाही. हे काही प्रमाणात शहरी भागात देखील होत असणार. मासिक पाळी, सॅनिटरी पॅड, टैम्पून्स आणि मेन्स्ट्रुल कप...

सामाजिक सहल - सृजन यात्रा

इमेज
कराड येथील ' सेवायोग सामाजिक विकास प्रतिष्ठान ' सामाजिक क्षेत्रात काम करणारी स्वयंसेवी संस्था आहे. सामाजिक भान जपणाऱ्या तरुणांसाठी संस्थेने 'सृजन यात्रा' नामक उपक्रम सुरू केला. महाराष्ट्रातील विविध ठिकाणी काम करणाऱ्या संस्था, आदर्श व्यक्ती यांच्याशी भेट आणि संवाद साधणारी ही सामाजिक सहल आहे. संस्था आणि कर्तृत्ववान व्यक्ती यांच्या कामाची प्रेरणा नव्या पिढीला मिळावी आणि त्या प्रेरणेतून कोणीतरी त्यांच्या भागात सामाजिक काम सुरू करावे. तथा जाणिवा जागृत कराव्या हा यात्रेचा मूळ हेतू आहे. यात्रेची संकल्पना २०१४ साली मांडली गेली आणि २०१५ पासून यात्रेला सुरवात झाली. ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान सृजन यात्रा पार पडते. ही यात्रा कमीत कमी चार ते जास्तीत जास्त आठ दिवसांची असते. त्याचे नियोजन पाच-सहा महिन्याआधी सुरू असते. तेथील संस्थांची यादी करून त्यांना भेटी देऊन यात्रेकरूंच्या जेवण आणि राहण्याच्या सोयीचे पाहिले जाते. यात्रेत सहभागी होण्यासाठी सेवायोगच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने नोंदणी केली जाते. त्यात अनेक प्रश्नांची विचारणा केली जाते. आणि यात्रेकरूंची निवडप्रक्रिया होते. निवड झ...

समाजबंध संस्थेच्या माध्यमातून Period Revolution अभियान

इमेज
"जागतिक मासिक पाळी आरोग्य व्यवस्थापन दिनानिमित्त समाजबंध संस्थेतर्फे महिनाभर Period Revolution अभियान" एक लाख लोकांचे पाळी विषयी प्रबोधन करण्याचा निर्धार समाजबंध संस्थेने घेतला आहे. जगभर २८ मे हा 'जागतिक मासिक पाळी आरोग्य व्यवस्थापन दिन' म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने या विषयावर २०१६ पासून काम करणाऱ्या समाजबंध या संस्थेच्या वतीने महिनाभर "Period Revolution २०२१" हे अभियान राबवले जात असून 'मासिक पाळीस पूरक समाज निर्मितीसाठी' असे या अभियानाचे ब्रीदवाक्य आहे. मासिक पाळी विषयी समाजात असणाऱ्या अंधश्रद्धा व अज्ञान दूर करून महिलांना सन्मानाने जगता यावं यासाठी याविषयी समाजात अगदी खुलेपणाने बोललं गेलं पाहिजे. पण सामाजिक लज्जेमुळे असे होत नाही व याचा तोटा महिलांच्या एकूणच विकासावर होतो. या विषयाची अस्पृश्यता दूर करण्यासाठी या अभियाना अंतर्गत अनेक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियाना अंतर्गत पाळीविषयी जास्तीत जास्त बोललं, लिहिलं, ऐकलं व वाचलं जावं जेणेकरून याविषयी समाजात असणारी लज्जा व अस्पृश्यता नाहीशी होईल यासाठी मासिक पाळी या विषयावर विविध स्...

प्रयोगशील शिक्षक - विनेश

इमेज
२०१८च्या दरम्यान जिल्हा परिषद शाळेचे केंद्रप्रमुख नवनाथ जाधव सरांबरोबर पालघर जिल्ह्याच्या तलासरी तालुक्यातील  ठराविक जिल्हा परिषद शाळांना भेटी दिल्या. त्या भेटी दरम्यान विनेश धोडी या प्रयोगशील शिक्षकाशी परिचय झाला. आमची भेट सिगलपाडा शाळेत झाली. शाळेतल्या खोलीत गेल्यावर चित्रे, फुलदाण्या आणि तोरण असे बरेच काही पाहायला मिळाले. विनेश मूळचे तलासरीच्या वेवजी गावचे. त्यांचे शालेय शिक्षण डहाणू तालुक्याच्या बोरिगाव येथील आश्रमशाळेत झाले. भांडुप येथील नवजीवन महाविद्यालयातून त्यांनी डी.एड. चे शिक्षण पूर्ण केले. ते सध्या गिरगाव केंद्रातील जिल्हा परिषद शाळा आरजपाडा येथे आहेत. विनेश यांना कार्यानुभवाची आवड शालेय शिक्षणापासूनच होती. टाकाऊपासून टिकाऊ, कागदांपासून काहीतरी बनवणे हे सारे उद्योग सुरू असायचे. शालेय शिक्षणात त्यांचा कार्यानुभव हा विषय नाही पण आवड म्हणून ते विद्यार्थ्यांना क्राफ्टिंगचे धडे देत असतात. शालेय विषय शिकवून झाल्यावर वेळ काढून विद्यार्थ्यांना क्राफ्टिंगमध्ये रममाण करण्याचा प्रयत्न सुरू असतो. गणेशोत्सव दरम्यान शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मातीचा गणपती, शाळेत आलेल्या पाहुण्यांसाठ...

चालतं फिरतं ग्रंथालय

इमेज
वाचन संस्कृती रुजावी म्हणून काही वाचनालय किंवा संस्था विविध मार्गाने प्रयत्न करत असतात. तसाच काहीसा प्रयत्न बारामती येथील बेचाळीस वर्षीय राजेंद्र सुमंत करत आहेत. मागील सोळा वर्षांपासून(२००६) वाचकांसाठी पुस्तकं घरपोच पोचविण्याची सेवा देत आहेत. राजेंद्र सुमंत यांनी वाई येथील किसन वीर महाविद्यालयातून कला शाखेची पदवी संपादन केली आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांना साहित्य क्षेत्र आणि वाचनाची गोडी लागली. ते वाई येथील लोकमान्य टिळक ग्रंथालयाचे १९९९ साली सभासद झाले. तेथे त्यांचे वाचन सुरू असायचे. वाचनालयात दुरून येणारे वाचक, तेथील व्यवस्था हे सारे त्यांच्या नजरेखालून जात होते. त्याच दरम्यान त्यांना वाचनालय सुरू करण्याची कल्पना सुचली. पण त्याचे नियोजन कसे करता येईल? या विचारांतच दोन-तीन वर्षांचा कालावधी गेला. राजेंद्र सुमंत घरगुती वाचनालय सुरू केल्यावर वाचक तेथपर्यंत पोचेल की नाही या साऱ्या गोष्टींचा विचार करून त्यांनी पुस्तक घरपोच देण्याचा विचार केला. या निमित्ताने त्यांचा जनसंपर्कदेखील वाढणार होता. ०१ जानेवारी २००६ रोजी 'साहित्य संस्कृती' या नावाने ग्रंथालय' सुरू केले. त...

शालेय उपक्रम

इमेज
आम्ही शाळेतील विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करत असतो. त्यातील एक उपक्रम जानेवारी २०१९ दरम्यान आयोजित केलेला. तो उपक्रम नेमका काय होता त्याविषयी जरा लिहिले आहे. मूळ पोस्ट २०१९ ची आहे. विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या विषयांवर लिहायला सांगितले होते. त्यांनी केलेले लिखाण वाचले. बरेच विद्यार्थी छान व्यक्त झालेत. त्या विद्यार्थ्यांना लिहायला काय देऊ हा मोठा प्रश्न आमच्यासमोर होता त्यातल्या त्यात एका पाड्यावरची शाळा जिथे घर, शाळा, शेती, काम, अभ्यास या पलीकडे काहीच नाही. त्या शाळेतल्या सरांशी बोलून काही विषय निवडायचे ठरले. माझे सहकारी विकास, ज्योती, उज्वला यांच्याशी चर्चा करून पंधरा-वीस विषयांची यादी तयार केली. इमारत कशी बांधली जाते? वर्तमानपत्रे आपल्या पर्यंत कसे पोचतात? परिसरातील बाजार? तुमच्या परिसरातील विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवलेले व्यक्ती. वाचनाची आवड कशी निर्माण करता येईल? हे विषय देण्यात आले. मुलींना मासिक पाळीविषयी लिहायला सांगितले. शाळेत शिकवलेलं घरी जाऊन अभ्यास करणे. त्यानंतर गप्पा गोष्टी आणि मस्ती. यापेक्षा जर त्यांना एखाद्या गोष्टीत गुंतवून त्यावर जर विचार करण्य...

"पर्यावरण संवर्धन यात्री - प्रणाली चिकटे"

इमेज
जागतिक तापमान वाढ, प्रदूषण, पर्यावरणाचा ऱ्हास याविषयी बरंच काही बोललं जातं पण त्यावर नेमकी कृती होत नाही. यवतमाळ जिल्ह्याच्या पुनवट गावातली बावीस वर्षीय तरुणी प्रणाली बेबी विठ्ठल चिकटे हिने 'पर्यावरण संवर्धन यात्री' म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर सायकल भ्रमंती करण्याचा निर्णय घेतला आहे. तिने ऑक्टोबर २०२० मध्ये पुनवट येथून सायकल भ्रमंतीसाठी सुरवात केली. एप्रिल २०२१ अखेर सात हजार किलोमीटरचा टप्पा पार करत तिने पालघर जिल्ह्यात प्रवेश केला. या सायकल भ्रमंतीतून ती पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत आहे. प्रणालीने चंद्रपूरच्या पडोली येथील एस.आर.एम. कॉलेज ऑफ सोशल वर्क येथून बीएसडब्ल्यू पदवी संपादन केली. पर्यावरण संवर्धन यात्री - प्रणाली चिकटे आई-वडील आणि तीन बहिणी असे तिचे कुटुंब. उदरनिर्वाहासाठी आई-वडील शेती करतात आणि दोन मोठ्या बहिणी शिक्षण घेऊन नोकरी करत आहेत. प्रणाली सगळ्यात लहान. शाळेत असतानाच तिला पर्यावरण या विषयात रुची होती. सततचे वातावरण बदल आणि त्याचा शेतीवर होणारा परिणाम या सगळ्यांविषयी तिला जाणीव निर्माण झाली. देश विकासाच्या दृष्टीने जरी जात असला तरी पर्यावरणाची जाणीव ठेवूनच विचार ...

सामाजिक कार्यकर्त्या प्रिया जाधव

इमेज
सोशल मीडिया फार प्रभावी माध्यम आहे. तेथे बऱ्याच अनोळखी व्यक्तींशी परिचय होतो. त्यांतील काही माणसांच्या कामाचा आवाका प्रचंड असतो. भांडुपच्या प्रिया जाधव यांचे कामही तसेच काहीसे आहे. फेसबुकवर आमचा परिचय झाला. दोन-तीन वेळा सामाजिक उपक्रमानिमित्त बोलणं झालेलं. प्रिया जाधव ह्या मूळच्या भांडुपच्या त्यांचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण भांडुप येथेच झाले. समाजासाठी काम करताना त्यांच्या समस्या किंवा लागणारी मदत गरजूंपर्यंत कशी पोहचू शकते या सगळ्यांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला. २०१२ पासून त्यांनी कल्याण, ठाणे, मुंबई येथील अनेक संस्थांसोबत काम केले. महिला दिनाच्या निमित्ताने उद्योगांबाबत मार्गदर्शन, महिलांच्या समस्या इत्यादी कामांचा अनुभव त्यांनी घेतला. ही सगळी कामं करताना ती प्रामाणिकपणे करता येतील का? येणाऱ्या समस्यांना सामोरे जाऊ शकतो का? याचा सारासार विचार करून समाजकार्याचा वसा त्यांनी हाती घेतला. समाजातील दुर्लक्षित व्यक्तींसाठी पुढे सरसावून त्यांना मदत करण्याचे ठरवले. प्रिया जाधव २०१७ साली प्रणय सावंत, प्रिया जाधव आणि इतर सहकाऱ्यांनी एकत्र येऊन 'देवामृत फाउंडेशन' संस्था सुरू केल...

गुजरात येथील १६१ वर्ष जुनी मराठी शाळा

इमेज
उंबरगाव येथे रविवारच्या बाजारात आलो असताना 'मराठी मिश्र शाळा' या नावाचा फलक नजरेसमोर आला. गुजरातसारख्या शहरात(उंबरगाव) जिल्हा परिषदेची मराठी शाळा? याविषयी मला जरा कुतूहलच वाटले. शाळेचे संपूर्ण बांधकाम दगडी. शाळेची स्थापना १८६० सालची म्हणजे तब्बल १६१ वर्ष जुनी शाळा. रविवारी शाळेला सुट्टी असल्यामुळे गेटला कुलूप लावले होते. आज कामानिमित्त तेथे जाणे झाले तेव्हा तिथल्या शाळेला भेट दिली. मुख्याध्यापिका सुर्वे मॅडम यांच्याशी शाळेविषयी चर्चा करत होतो. पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग या शाळेत भरतात. सुर्वे मॅडम सांगत होत्या, वलसाड जिल्ह्यात फक्त दोनच मराठी शाळा आहेत. एक उंबरगाव आणि दुसरी सारिगाम येथे. त्यात उंबरगाव येथील शाळा खूप जुनी. तेथे मराठी, गुजराती, हिंदी आणि इंग्रजी या चार भाषांचे विषय सक्तीचे आहेत. अभ्यासक्रमात इयत्ता तिसरी पासून गुजराती हा भाषा विषय आहे पण विद्यार्थ्यांना इयत्ता पहिली आणि दुसरीतच त्या भाषेची गोडी लावली जाते. सोबत मराठी भाषादेखील असतेच. चारही भाषांची शिकवण असल्यामुळे माध्यमिकमध्ये प्रवेश घेताना फारशी अडचण येत नाही. शाळा शाळेबरोबर कागदोपत्री व्यवहार गुजराती भाषेतच हो...