'उत्सव कलाम' उपक्रम-२०२२
बाराखडीच्या माध्यमातून शाळा आणि महाविद्यालयात दरवर्षी 'उत्सव कलाम' उपक्रम राबवत असतो. अब्दुल कलाम यांच्या जयंतीच्या निमित्ताने हा उपक्रम सुरु केला. उपक्रमाचे पहिले वर्ष २०१९ . तलासरी तालुक्यातील काही शाळांमध्ये हा उपक्रम राबवण्यात आला. मुख्य उद्देश होता की विद्यार्थ्यांने अवांतर विषयावर चर्चा केली पाहिजे त्याचे शोध घेतले पाहिजे. म्हणून पहिल्या वर्षी विद्यार्थ्यांना ‘मी शास्त्रज्ञ झालो तर’, ‘मानवाने विज्ञान उपयोगी लावलेला महत्त्वपूर्ण शोध’, ‘भारत आणि अवकाश संशोधन’ आणि ‘भारतीय उपग्रह माहिती व उपयोग’ हे चार विषय दिले होते. विषय जरा कठीणच होते. परंतु काही विद्यार्थ्यांनी उत्तम निबंध लिहिले होते. महत्त्वपूर्ण शोध या विषयात वीज, सायकल, गॅस या विषयांवर लिहिले गेले; पण आम्हाला त्यांतील एक विद्यार्थी असा मिळाला, की त्याने ‘स्क्रू’विषयी माहिती लिहिली. त्याचे नाव मनोहर धोडिया. त्याने त्याच्या निबंधात मांडले होते, की स्क्रूशिवाय पंखा फिरणे शक्यच नाही हे नववीच्या विद्यार्थ्याला सुचणे आम्हाला आनंददायी वाटले. काहींनी कलाम यांच्याविषयी छानपैकी माहिती लिहिली. ‘इस्रो’चे सध्याचे अध्यक्ष के. सीवन ...