बाप्पाला पत्र २०२० - गणेशोत्सव
प्रिय गणपती बाप्पा, यावेळी तुझं आगमन आम्ही थाटामाटात करू शकलो नाही याची खंत कायम मनात राहील. इच्छा असूनही काहीच करता येत नाही नाईलाज आहे सगळा. संपूर्ण देशभर कोरोना रोगाची आपत्ती कोसळली आहे. मागच्या वर्षी तर पावसाच्या पाण्याने झोडपले होते. अनेकांचे घर पुरामुळे बुडाले होते. पै पै जमवलेलं सगळं वाहून गेलं. पण नव्या जोमाने आम्ही पुढे आलो आणि संसार पुन्हा नव्याने थाटला. आता सगळं सुरळीत असताना यावर्षी मात्र कोरोनाने वाट लावली. इथे ना नव्याने सुरवात करता येत, ना जवळच्या व्यक्तींना भेटता येतं. लॉकडाऊनमुळे काही जण दूरवर अडकले त्यांना स्वतःच्या घरीही जाता येईना. अशा परिस्थितीत नातेवाईकांकडे पण जाता येईना. आम्ही मोकळा श्वास घेत कोठेही जायचो पण मार्चपासून तोंडाला मास्क आणि सतत हात स्वच्छ ठेवणं हे आता गरजेचंच झालंय. लॉकडाऊनमध्ये रोजंदारीवर काम करणाऱ्या माणसाची तर पूर्णतः वाट लागली आहे. दोन वेळचं जेवण करणारा माणूस आता काटकसरीनंच जगतोय. देशाचा अन्नदाता आपला शेतकरी बांधव त्याने राब राब राबून शेतात पिकं घेतली पण बाजारच बंद असल्यामुळे त्याला हवा तो भाव मिळाला नाही. मग घरात अन्न सडवण्यापेक्षा त्याने अगदी ...