पोस्ट्स

मार्च, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

माणुसकी जपणारी मानवता

२०१८ ची घटना पुण्यातल्या वारजे येथील पाटील इस्टेट झोपडपट्टीला आग लागलेली या आगीत अनेक घरे जळाली. त्यांना मदत म्हणून पुण्याच्या एका मित्राने फेसबुकवर मदतीसाठी आवाहन केले होते. त्याची पोस्ट मी फेसबुक आणि व्हाट्सअपवर पोस्ट शेअर केली. समोरून निलेश बच्छाव या अनोळखी व्यक्तीचा लगेच रिप्ले आला. काय काय मदत लागेल ते कळवा. मदतीसाठीचं लागणारं साहित्य त्याला कळवलं आणि अगदी एका दिवसांत त्याने खूप सारे चांगल्या स्थितीत असलेले कपडे, अंथरून पद्धतशीर घड्या घालून जमा केले. आणि माझा मित्र परमेश्वर घोडके करवी पुण्याला पाठवले. या कामांतून निलेशशी ओळख झाली. फेसबुकवर त्याच्या पोस्ट पाहिल्या. रस्त्यावर राहणाऱ्या व्यक्तींसाठी जेवण पोहचवणे, त्यांना दवाखान्यात नेऊन योग्य तो उपचार करवून घेणे. अशी कामे तो आणि त्याचे मित्र कुशल, साई करत असतात. निलेश आणि कुशलबरोबर फोनवर सविस्तर बोलून त्यांच्या कामाविषयीची माहिती घेतली. हे तिघेही साईबाबांचे भक्त. राहायला उल्हासनगरमध्ये. दर गुरुवारी न चुकता साईबाबांच्या मंदिरात आरतीला जातात. २०१७ चा प्रसंग त्यांनी सांगितला. त्या मंदिरात दर गुरुवारी प्रसाद घ्यायला एक अपंग माणूस यायच...

अनेक महिलांना उद्योगात सक्षम बनविणारी उद्योगवर्धिनी संस्था

इमेज
देशभर कोरोना महामारीचे संकट कोसळले असताना अशा परिस्थितीत मैदानी पातळीवर काम करणे म्हणजे जरा जिकरीचेच. सोलापूरच्या उद्योगवर्धिनी संस्थेविषयी ०८ मार्चला ब्लॉगवर लेख लिहिला होता. लॉकडाऊन दरम्यान उद्योगवर्धिनीकडून बरीच कामे झाली. मार्च महिन्यात लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर रोजंदारीवर काम करणाऱ्या माणसांची अवस्था बिकट झाली होती. एप्रिल-मे दरम्यान रुग्णांची संख्या वाढतच होती. बाहेरचे खाणे बंद. मग अशा परिस्थितीत जेवणाचे हालच. उद्योगवर्धिनीच्या अन्नपूर्णाची सगळी टीम सज्ज झाली. कोरोना महामारीत योग्य ती काळजी घेऊन सगळ्या महिला कामाला लागल्या. रूग्णालयात दाखल केलेले कोरोना रुग्ण, कोरान्टाईन व्यक्ती, डॉक्टर, नर्स अशा व्यक्तींना जेवणाचे डबे पोहचवण्याचे काम सुरू झाले. सोलापूर येथील अश्विनी आणि सिव्हिल हॉस्पिटल, समर्थ बँक येथे तीनशे ते चारशे जेवणाचे डबे दररोज(लॉकडाऊन असेपर्यंत) पोहचत होते. तसेच रोटरी क्लब आणि रोटी बँकच्या माध्यमातून सातशे ते आठशे डबे पोहचत होते. जेवण बनवण्याचे काम उद्योगवर्धिनीकडेच होते. महाराष्ट्रात राहणाऱ्या परराज्यातील लोकांना त्यांच्या घरी जाता यावे म्हणून लॉकडाऊन दरम्यान काही ट्र...