पोस्ट्स

जून, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

फॅन्ड्री फाउंडेशनचा प्रोजेक्ट होप...

इमेज
फॅन्ड्री फाउंडेशन 'Project Hope' उपक्रमाअंतर्गत शैक्षणिक साहित्य आणि इतर उपक्रमांचे आयोजन करते. जून महिन्यात शाळा सुरु झाली की साहित्य वाटपाची तयारी सुरु होते. फॅन्ड्रीच्या कार्यक्रमाची माहिती प्रवीण दाभोळकरांकडून समजली. फॅन्ड्रीच्या स्वयंसेवकाशी संपर्क साधून त्यांच्या उपक्रमात सामील झालो. पालघर जिल्ह्यातील मनोरपासून आठ-दहा किलोमीटर अंतरावरील तांबडीपाडा येथे शैक्षणिक साहित्य वाटपासाठी गेलो होतो. फॅन्ड्रीची टीम होतीच त्यांच्यासोबत मी आणि कामिनी नव्याने जोडलो गेलो होतो. पाड्यात गेल्यावर शाळा पाहिली. शाळेतील शिक्षक संतोष निमसे सरांनी स्वागत केले. इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतची शाळा. आधी वाटलेलं की गरम व्हायला नको म्हणून विद्यार्थ्यांना अंगणात बसवलं असेल. पण सरांशी चर्चा केल्यावर समजलं की त्या अंगणातच शाळा भरते. पूर्वी तेथे गोठा होता. आता तो दुसऱ्या ठिकाणी बांधण्यात आला आहे. गावातल्या मुलांना शिक्षणासाठी दुसऱ्या पाड्यात जावे लागायचे. त्यांचा त्रास वाचावा म्हणून तांबडीपाडा येथे शाळेसाठी मान्यता मिळवली. परंतु जागा उपलब्ध नसल्यामुळे पाड्यात कोणाच्या तरी घरी शाळा सुरु करावी लागणार होती....