महालक्ष्मी जत्रा अन् भीमबांध...
मुंबई-अहमदाबाद मार्गालगत असलेल्या विवळवेढे(महालक्ष्मी) गावात चैत्र पौर्णिमा ते चैत्र अमावस्या या दिवसांत जत्रा भरते. या जत्रेला मुंबई, नाशिक आणि सुरत या ठिकाणाहून येणारी भक्तगणांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. विवळवेढे गावापासून सहा-सात किमी अंतरावर वाघाडी गाव आहे आणि त्या गावात भीमबांध म्हणून एक पर्यटनस्थळ प्रसिद्ध आहे. महालक्ष्मी मंदिर अन् जत्रेतील पाळणा. भीमबांधची एक दंतकथा आहे. असं म्हणलं जातं कोल्हापूरची महालक्ष्मी या मार्गाने जात होती. त्यावेळी पांडव वनवासात होते. महालक्ष्मी भ्रमण करत असताना मातेची अन् भीमाची गाठ पडली. मातेचा शृंगार पाहून भीमाने त्या मातेकडे विवाहाचा प्रस्ताव मांडला. हा प्रस्ताव मातेला अनुचित वाटला पण मातेने भीमापुढे एक अट ठेवली. वाघाडी गावातून वाहणाऱ्या सूर्यानदीवर एका रात्रीत बांध बांधून ते पाणी मुसळ्या डोंगराकडे वळविणे. भीमाने ही अट मान्य करत बांध बांधण्याचे काम सुरु केले. काम पूर्ण होऊन काहीतरी अनर्थ घडेल या भीतीने मातेने कोंबड्याचं रूप धारण करून बांग दिली. भीमास वाटले, पहाट झाली. त्याने स्वतःची हार मान्य करत हा बांध अपूर्णच ठेवला. आजही तेथे गेलात तर तो बांध ...