शाळा भेट अन् वाचन संवाद
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने प्रत्येक ठिकाणी काहीतरी उपक्रम सुरु होते. अमृतमहोत्सवात आपणही काहीतरी योगदान द्यावं म्हणून आमच्या बाराखडी टीमकडून 'शाळा भेट अन् वाचन संवाद' या उपक्रमाची आखणी करण्याचे ठरवले. बाराखडीच्या माध्यमातून आम्ही शाळांमध्ये विविध उपक्रम राबवत असतो. त्यांतील पुस्तकांची शिदोरी' नामक उपक्रम राबवतो. या उपक्रमात जिल्हा परिषद शाळांना पुस्तकं देऊन त्यांच्याशी त्यावर चर्चा करतो. जिल्हा परिषद आवारपाडा शाळेत पुस्तकांची शिदोरी उपक्रम. मी महाराष्ट्र-गुजरात सरहद्दीजवळील उंबरगाव येथे राहतो. तेथून तलासरी तालुका सतरा किलोमीटर अंतरावर आहे. संपूर्ण तलासरी तालुका पायी फिरायचा आणि या तालुक्यात येणाऱ्या निवडक शाळा-महाविद्यालयांना भेटी देऊन विद्यार्थ्यांशी पुस्तक आणि वाचनासंदर्भात संवाद साधायचा असे ठरले. तालुक्याचा विस्तार अंदाजे सत्तर ते नव्वद किलोमीटर असावा. प्रवास कोठून सुरु करायचा आणि थांबा कुठे घ्यायचा त्याचे नियोजन केले. १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान प्रवास करण्याचे ठरले. आम्ही काम करत असताना जिओलाईफ(Geolife) ऍग्रीटेक नामक कंपनी आमच्या संपर्कात आली त्या कंपनीच...