पोस्ट्स

जून, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

स्थलांतरित प्रवासी

इमेज
आज(१८ जून) कामावर जायला निघालो तेव्हा वाटेत एक व्यक्ती दिसला. त्याने त्याच्या बॅगेला भारतीय ध्वज बांधला होता आणि एक छोटी पाटी होती. मला जरा कुतूहल वाटले म्हणून त्याच्याकडे गेलो. त्याची माहिती घेतली. त्याचं नाव नरेश शिजापती. मूळचा नेपाळचा पण कामानिमित्त अहमदाबाद येथे आला. तो अहमदाबाद येथे पनाह फाउंडेशनसोबत नऊ वर्षांपासून काम करत आहे. पनाह फाउंडेशन स्थलांतरितांसाठी(migration) काम करते. कोविड काळात स्थलांतरित झालेल्या लोकांसाठी त्यांनी काम केलं आहे.  प्रवासी नरेश शिजापती नरेश स्वतः स्थलांतरित(migrate) व्यक्ती आहे. चार वेळा त्याला स्थलांतर करावे लागले आहे आणि प्रत्येक ठिकाणी मिळणारा अनुभव वेगळा होता. त्याचं म्हणणं आहे की, कामगार वर्ग दिवसाचा तीनशे रुपये रोजगार कमावतो आहे पण त्याला हवा तसा सन्मान कोठे मिळतो? त्यांना कायम दुय्यम लेखलं जातं. अशा या कामगार वर्गासाठी त्याने संकल्प केला आहे. दहा राज्यातून तो पाच हजार शंभर किलोमीटर प्रवास करणार आहे. हा प्रवास नऊ महिने सुरू राहणार आहे. दहा राज्यच का? तर जेथे स्थलांतरणाचे प्रमाण अधिक आहे अशाच ठिकाणी त्याने जायचे ठरवले आहे. या प्रवासाला १४ जूनपा...