"बाराखडी-प्रवास अ ते ज्ञ चा..."
आम्ही सात मित्रमैत्रिणी मिळून ‘बाराखडी’ नामक एक समूह ए. पी. जे अब्दुल कलाम यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने सुरू केला. प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रात कार्य करण्याचा मानस ठेऊन वाटचाल चालू आहे. तसेच इतरही सामाजिक उपक्रम राबवण्याचा प्रयत्न समूहातर्फे होत असतो. कलाम यांचा जन्मदिवस 'वाचन प्रेरणा दिन' म्हणून साजरा केला जातो. त्याचे औचित्य साधून आम्ही 'उत्सव कलाम' हा उपक्रम घेण्याचे ठरवले. २०१९ साली उत्सव कलाम उपक्रम पार पडला. हा उपक्रम दरवर्षी घेऊयात असे ठरले. २०२१ हे उपक्रमाचे दुसरे वर्ष! वाचनाची आवड असणाऱ्यांसाठी बाराखडी समूहाने महाराष्ट्र-गुजरात सरहद्दीजवळील उंबरगाव येथे ' बाराखडी ज्ञानकेंद्र ' सुरू केलं आहे. तेथे मराठी आणि इंग्रजी पुस्तकं उपलब्ध आहेत. आकर्षक दिवाळी अंक, मार्मिक व इतर अंक तसेच शाळेतल्या मुलां-मुलींसाठी 'मुलांचे मासिक', 'वयम' अशी मासिकं उपलब्ध आहेत. सध्या तरी पुस्तक मिळवण्याची सुविधा तलासरी, उंबरगाव इथपर्यंत आहे. ज्ञानकेंद्रात असलेल्या पुस्तकांची यादी तुम्ही येथे पाहू शकता. 'बाराखडी' समूहातील सदस्य याआधी विविध ठिकाणी वैयक्तिक...