'व्यसनाधीन' माणसांना मिळतो येथे ''सहारा''
मागच्या वर्षी मी आणि माझे मित्र पाणी फाउंडेशनच्या महाश्रमदान शिबिराला गेलो होतो. पाणी फाउंडेशनसोबत काम करण्याचा आमचा तो पहिलाच अनुभव होता. ऑनलाईन नोंदणी केली आणि आम्हाला मॅसेज आला. सिन्नर तालुक्यातील वडझिरे गाव येथे आम्हाला श्रमदानासाठी जायचे होते. ३० एप्रिलच्या संध्याकाळी आम्ही कल्याण येथून सिन्नरकडे निघालो होतो. रात्री १२-०१ च्या दरम्यान सिन्नरला पोहोचणार होतो. थांबायचे कोठे हे अजून ठरले नव्हते. थिंक महाराष्ट्रच्या माहिती संकलन मोहिमेमुळे सिन्नरच्या किरण भावसार यांच्याशी चांगलाच परिचय झाला होता. त्यांना आमचे नियोजन कळवले. त्यांनी एक सल्ला दिला. सिन्नरपासून पंचवीस किलोमीटर अंतरावर मेंढी गाव आहे. तेथे मधुकर गीतेंचं 'सहारा व्यसनमुक्ती केंद्र' आहे. त्या केंद्राला भेट द्या आणि त्यांचे काम पहा. तिकडे तुमची सगळी व्यवस्था होईल. रात्री साडेदहा दरम्यान गीतेंना फोन केला आणि आम्ही संस्थेला भेट द्यायला येतोय असे कळवले. गीतेंनी अगदी मनापासून स्वागत केले ते म्हणाले तुम्ही या जेवणाची आणि झोपण्याची व्यवस्था करतो. जेवणापेक्षा आम्हाला हवी होती झोप. कारण दुसऱ्या दिवशी श्रमदान आणि आणखी एका संस्थ...