पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जुन्या जळगावची १५० वर्षाची रथोत्सवाची परंपरा...

इमेज
कार्तिकी प्रबोधिनी एकादशीच्या निमित्ताने दरवर्षी रथ चौक(जुनं जळगाव) येथे श्रीरामांच्या रथ यात्रेचा मोठा उत्सव होतो. या उत्सवाला दीडशे वर्षांची परंपरा आहे. लोकं हिरीरीने सहभागी होतात. सुरवातीला लहान मुलांनी तयार केलेले रथ आणि त्यांचं वाद्य मंडळ. मग पुढे मोठा रथ, अयोध्याच्या राम मंदिराची प्रतिकृती तयार केलेलं छोटंसं मंदिर आणि त्यामागे एक वाहन त्यात राम, लक्ष्मण, सीता आणि हनुमान असा गेटअप केलेले कलाकार. आणि शेवटी फुलांच्या माळानी सजवलेला मुळ मोठा रथ. रथ ओढून नेण्यासाठी त्याला दोरखंड बांधलेले असतात. तो रथ जनसमुदाय हाताने ओढला जातो. जुनं जळगावच्या आळीतून हा रथ नेला जातो. या रथात श्रीराम, लक्ष्मण, सीता आणि हनुमान यांच्या जुन्या मुर्त्या. श्रीराम, लक्ष्मण आणि सीता यांच्या मुर्त्या असणारा मूळ रथ.  रथ उत्सवाचे आयोजन श्रीराम मंदिर संस्थान करते. या उत्सवात भवानी मातेचे सोंगं नाचवली जातात. ही सोंगं करणारी मंडळी बहुतांशी पुरुषच असतात. चेहऱ्यावर रंग चढवून, मोराचा पिसारा असणारा भला मोठा मुकुट डोक्यावर घेऊन वाद्याच्या तालावर नृत्य करणं. हा उत्सव जेव्हा थांबेल तेव्हा ही सोंगं नृत्य करायचं थांबतात. ...