अनाथांची अम्मा...
महाराष्ट्र-गुजरात सीमेलगत असलेल्या दहाड गावात 'समारिटन चिल्ड्रन होम' नावाचे अनाथाश्रम आहे. समारिटन म्हणजे 'चांगल्या सेवेचं घर'. या चांगल्या सेवेची सुरवात मुंबईच्या मारिया स्टेल्ला यांनी केली. आश्रमातील मुलं-मुली त्यांना प्रेमाने अम्मा म्हणतात. अम्मा मुळच्या दक्षिण भारतीय पण त्यांचं बालपण आणि शालेय शिक्षण भांडुप येथेच झालं. अम्माच्या वडिलांनी त्यांच्या कुटुंबाला लहानपणीच सोडून दिलं. त्यामुळे त्यांच्या घरची परिस्थिती अगदी बेताची झाली होती. अम्मा आणि त्यांची मोठी बहीण नगरपालिकेच्या शाळेत शिक्षण घेत होते. कमावता माणूस घरात नसल्याने लहानपणीच जबाबदाऱ्या आल्या होत्या. मोठ्या बहिणीने शिकलं पाहिजे म्हणून अम्माने कामाला जायला हवं असा त्यांच्या आईचा आग्रह असायचा. अम्मा शाळेत हुशार होत्या. शाळेतल्या विविध खेळांत त्या सहभागी होत. त्यांच्या आई म्हणायच्या, मोठी बहीण शिकून स्थिरस्थावर झाली की लहान बहिणीला पुढे नेईल. समारिटन चिल्ड्रन होम अम्मा वयाच्या बाराव्या वर्षी एका साडीच्या दुकानात कामाला लागल्या. सकाळच्या सत्रात शाळा आणि दुपारी काम असं त्यांचं सुरु असायचं. अम्माच्या चौदाव्या वर्ष...