आदिवासी भागातील विद्यार्थ्यांची विश्वविक्रमी नोंद विद्यार्थी
'डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन' आणि 'स्पेस झोन ऑफ इंडिया' द्वारा आयोजित "स्पेस रिसर्च पेलोड क्यूब्ज चॅलेंज २०२१" या स्पर्धेत पालघर जिल्ह्यातील एकोणतीस विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. कलाम इंटरनॅशनल फाउंडेशनचा शंभर पेलोड उपग्रह हेलिअम बलूनद्वारे बनवून अवकाशात नेण्याचा त्यांचा प्रकल्प होता. हा प्रकल्प ०७ फेब्रुवारी २०२१ रोजी रामेश्वरम येथे पार पाडला गेला. हा उपक्रम डॉ. ए.पी.जे कलाम कुटुंबियांद्वारे राबविला जातो. विद्यार्थ्यांना अवकाश संशोधनात रुची निर्माण व्हायला हवी. भविष्यात त्यांनी हे क्षेत्रही निवडले पाहिजेत यासाठी त्यांचा प्रयत्न आहे. रानशेत आश्रमशाळेतील अंजु कमलाकर भोईर सहभागी विद्यार्थिनी उपग्रह म्हणजे काय? तो नेमका कसा बनवला जातो? त्याचे विविध भाग कोणते? आणि त्याचं नेमकं कार्य काय? हेलिअम बलून म्हणजे काय? तो सेन्स कसा करणार आहे? या सर्व बाबींचे प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना देण्यात आले. २५ ग्रॅम ते ८० ग्रॅम वजनाचे शंभर उपग्रह बनवून आणि त्यांना पस्तीस हजार ते अडतीस हजार मीटर उंचीवर 'हाय अल्टीट्यूड सायंटिफिक बलून' द्वार...