सामाजिक कार्यकर्त्या प्रिया जाधव
सोशल मीडिया फार प्रभावी माध्यम आहे. तेथे बऱ्याच अनोळखी व्यक्तींशी परिचय होतो. त्यांतील काही माणसांच्या कामाचा आवाका प्रचंड असतो. भांडुपच्या प्रिया जाधव यांचे कामही तसेच काहीसे आहे. फेसबुकवर आमचा परिचय झाला. दोन-तीन वेळा सामाजिक उपक्रमानिमित्त बोलणं झालेलं. प्रिया जाधव ह्या मूळच्या भांडुपच्या त्यांचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण भांडुप येथेच झाले. समाजासाठी काम करताना त्यांच्या समस्या किंवा लागणारी मदत गरजूंपर्यंत कशी पोहचू शकते या सगळ्यांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला. २०१२ पासून त्यांनी कल्याण, ठाणे, मुंबई येथील अनेक संस्थांसोबत काम केले. महिला दिनाच्या निमित्ताने उद्योगांबाबत मार्गदर्शन, महिलांच्या समस्या इत्यादी कामांचा अनुभव त्यांनी घेतला. ही सगळी कामं करताना ती प्रामाणिकपणे करता येतील का? येणाऱ्या समस्यांना सामोरे जाऊ शकतो का? याचा सारासार विचार करून समाजकार्याचा वसा त्यांनी हाती घेतला. समाजातील दुर्लक्षित व्यक्तींसाठी पुढे सरसावून त्यांना मदत करण्याचे ठरवले. प्रिया जाधव २०१७ साली प्रणय सावंत, प्रिया जाधव आणि इतर सहकाऱ्यांनी एकत्र येऊन 'देवामृत फाउंडेशन' संस्था सुरू केल...