पोस्ट्स

सप्टेंबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आदिवासी भागातील प्रयोगशील शाळा

इमेज
मी शैक्षणिक साहित्य वाटपाच्या निमित्ताने पालघर जिल्ह्याच्या तलासरी तालुक्यातील गिरगाव केंद्राच्या जिल्हा परिषद शाळेला भेट दिली. शाळेतील वर्ग फिरलो आणि शिक्षकांच्या भेटी घेतल्या. वर्ग फिरत असताना, काही गोष्टी नजरेस पडत होत्या. एका वर्गात गेलो, तर तिकडे मंत्रिमंडळाचा एक तक्ता तयार केला होता. त्या तक्त्याकडे पाहिले आणि एक छान गंमत दिसली - मुख्यमंत्री, शिस्तमंत्री, सांस्कृतिकमंत्री, क्रीडामंत्री या पदांपुढे नावे वेगळीच दिसत होती. त्याविषयीची संपूर्ण माहिती शाळेचे मुख्याध्यापक वाघातसर आणि धोडीसर यांच्याकडून घेतली. तेव्हा त्यांनी सांगितले, की त्यांच्या शाळेत विद्यार्थ्यांचे मंत्रिमंडळ आहे. जूनमध्ये शाळा सुरू झाली, की निवडणूक होते. विद्यार्थी स्वेच्छेने निवडणूक लढवण्यासाठी उभे राहतात. विद्यार्थी उमेदवार “मला जर निवडून दिले तर मी शिस्तबद्धपणे आणि व्यवस्थितपणे काम करेन. कोठल्याही पद्धतीचा त्रास देणार नाही.” अशा प्रकारचा प्रचार निवडणुकीला उभा असलेला करत असतो. जिल्हा परिषद शाळा आरजपाडा(गिरगाव) मतदाराने निवडणुकीत चिठ्ठीत उमेदवाराचे नाव लिहून ती चिठ्ठी बॉक्समध्ये टाकायची असते. मतमोजणी सर्व विद्यार्...